Wednesday, August 28, 2019

प्रियांका चोप्राला पदावरून हटवा : पाकिस्तानी मंत्र्याची मागणी

वेब टीम : लाहोर
अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी यांनी युनिसेफला पत्र लिहून प्रियांका चोप्राला ‘सदिच्छा दूत’ या पदावरुन हटवण्याची विनंती केली.

प्रियांका चोप्राने काश्मीर प्रश्नी भारत सरकारच्या भूमिकेचे तसेच पाकिस्तानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याचे जाहीर समर्थन केले.

प्रियांका चोप्राने युनिसेफची सदिच्छा दूत या नात्याने शांततेचा पुरस्कार केला पाहिजे. पण तिची भूमिका या तत्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे.

त्यामुळे तिला या पदावरुन हटवावे अशी मागणी शिरीन मझारी यांनी आपल्या पत्रातून केली.

काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आयशा मलिका या पाकिस्तानी महिलेने लॉस एंजल्स येथील कार्यक्रमात प्रियांका चोप्राला ढोंगी म्हटले होते.

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर प्रियांक चोप्राने टि्वट करुन “जय हिंद” म्हटले होते.आयशा मलिकने त्या टि्वट त्यासंदर्भात प्रियांकाला ढोंगी म्हटले होते.त्यावर प्रियांकाने “मी भारतीय असून माझे बरेच मित्र पाकिस्तानी आहेत.

मला स्वतःला युद्ध व्हावे असे वाटत नाही. पण मी देशभक्त सुद्धा आहे. माझ्या त्या ट्वीटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी त्यांची माफी मागते” असे उत्तर दिले होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only