Wednesday, August 28, 2019

बालाकोट एअर स्ट्राईकवर येणार चित्रपट

वेब टीम : मुंबई
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकवर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार आहे.

या चित्रपटाची कथा बालाकोट एअर स्ट्राईक आणि विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर आधारित असल्याची माहिती अभिनेता विवेक ओबेरॉय याने दिली.

या चित्रपटाचे नाव ‘बालाकोट – द ट्रू स्टोरी’ असेल. हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

यातून सत्य घटना, भारतीय वायू सेनेचे शौर्य, रणनीती याची माहिती देण्यात येईल असे चित्रपट निर्मात्यांकडून सांगण्यात आले.

या चित्रपटात विंग कमांडर अभिनंदन यांनी दिलेल्या लढ्यावर देखील प्रकाश टाकण्यात येणार आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्ली, आग्रा आणि जम्मू काश्मीरमध्ये यावर्षाच्या अखेरपर्यंत होणार आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या आधी पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटातून मुख्य भूमिका साकारली होती.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only