Sunday, September 1, 2019

निवडणूक आयोगाआधीच मंत्री रावसाहेब दानवेंनी सांगितली आचारसंहितेची तारीख!वेब टीम
जालना -  महाराष्ट्र विधानसभेसाठी आचारसंहिता लागण्याची तारीख सांगण्याची भाजप नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या आधीच केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येत्या १३ तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे जाहीर करून टाकले आहे.

जालन्यात ओबीसी समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आचारसंहितेची तारीख जाहीर केली. याअगोदर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १३ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होईल, असा अंदाज लावला होता.

भाजप नेत्यांच्या आचारसंहितेच्या तारखा घोषित करणाऱ्यावर विरोधी पक्षांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे नेते तारखा कशा काय जाहीर करू शकतात? , असं विरोधी पक्षाने म्हटलेे आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only