Sunday, September 1, 2019

हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडविण्याची ; ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज?वेब टीम
मुंबई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी  विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यात वरळीत आदित्य ठाकरेंचे बॅनर्स लागल्याने ही चर्चा अधिकच जोर धरु लागली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते अनिल परब यांनी आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतूच लढणार असल्याची घोषणा गट प्रमुखांच्या मेळाव्यात केल्याचे समोर आले होते.

हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडविण्याची या मथळ्याखाली वरळीत आदित्य ठाकरेंचे बॅनर्स झळकले आहेत. आदित्य ठाकरे हे गेल्या अनेक दिवसांपासून वरळी विधानसभा क्षेत्रात फिरत आहेत, लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या सूचना आणि इतर नेत्यांची वक्तव्य पाहिली तर आदित्य याठिकाणी निवडणूक लढू शकतात हे जवळपास निश्चित मानले जात आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only