Tuesday, October 15, 2019

झी मराठी अवॉर्ड्समध्ये 'अग्गंबाई सासूबाई'ची बाजी


मुंबई - तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको ,अग्गंबाई सासूबाई या मालिका म्हणजे मराठी प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या मालिकांचा एक सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येतो . मालिकेतील कलाकारांना त्यांच्या कामाची पावती आणि मजा-मस्ती असा मनोरंन करणारा हा सोहळा नुकताच पार पडला.
या पुरस्कारांची प्रेक्षक आवर्जून वाट पाहत असतात. कोणता कलाकार काय सादर करणार... कोणत्या जोडीला प्रेक्षकांची वाह..वाह.. मिळाली, कोणती मालिका, सर्वोत्कृष्ट ठरेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असते. यंदा झी मराठी वाहिनीनं २० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला त्यामुळं भव्य स्वरूपात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या वर्षीच्या सोहळ्यात दोन मालिकांचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली मालिका 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेनं सर्वांत जास्त पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट सासू,सर्वोत्कृष्ट सून,सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट जोडी या एकूण नऊ पुरस्कारांवर मालिकेनं मोहोर उमटवली. तर, रात्रीस खेळ चाले-२ या मालिकेलाही अनेक पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट खलनायिका, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष), सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री) ,सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) हे पुरस्कार 'रात्रीस खेळ चाले-२'च्या टीमनं पटकावले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only