Saturday, November 30, 2019

पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत डेव्हिड वॉर्नरचं त्रिशतक


मुंबई :अ‍ॅशेस मालिकेतील खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेडच्या मैदानावरील दुसऱ्या कसोटीत सामन्यात वॉर्नरने त्रिशतक झळकावलं आहे. पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेताना वॉर्नरने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभा करुन दिला.
कसोटी क्रिकेटमधलं वॉर्नरचं हे पहिलं त्रिशतक ठरलं. याचसोबत वॉर्नरने अनेक विक्रमांचीही नोंद केली आहे.
अ‍ॅडलेड कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने ५०० धावांचा टप्पा ओलांडला असून पाकिस्तानचा संघ आता या आव्हानाला कसं प्रत्युत्तर देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only