Friday, November 1, 2019

या कारणांमुळे सोनं झालं एवढं महाग, हे आहेत आजचे दर




वेब टीम
नवी दिल्ली - सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा तेजी आलीय. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव वाढले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झालीय.
सोन्याचे भाव 115 रुपयांनी वाढून 39 हजार 17 रुपये प्रतितोळा झाले. 24 कॅरट सोन्याचे भाव बुधवारी 38 हजार 902 रुपये होते.  आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1500 डॉलर आणि चांदीचे भाव 18 डॉलर प्रतिऔंस झालं.
चांदीला आली झळाळी
चांदीचा भाव 95 रुपयांनी वाढून 47 हजार 490 रुपये प्रतिकिलो झाला.  HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, मजबूत ग्लोबल ट्रेंडमुळे गुरुवारी सोन्याचा भाव वाढला. रुपया कमजोर पडल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमतींमुळेही सोन्याला उभारी मिळाली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only