Friday, November 1, 2019

शिवसेनेनं ठरवलं तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करू शकतो - संजय राऊत


वेब टीम
मुंबई - शिवसेनेनं ठरवलं तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करू शकतो असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
राऊत पुढे म्हणाले की, आम्हाला मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समसमान वाटप हवे आहे. मुख्यमंत्र्यांनी आजच शपथ घ्यायला काय हरकत आहे? ते यासाठी 8 दिवस का थांबले? भाजपने चर्चा का सुरू केली नाही. भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी खुशाल शपथविधी करावा. परंतु शिवसेना मात्र स्थिर सरकारसाठी बहुमत सिद्ध करेल, असे म्हणून संजय राऊतांनी मोठा इशाराच भाजपला दिला.
दरम्यान संयज राऊत यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांच्या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नव्हते. बळीराजाच्या प्रश्नावर आमच्यात चर्चा झाली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात आहे. राज्यात सध्या सरकार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच आम्ही पवारांशी चर्चा केली, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only