Wednesday, March 10, 2021

22 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस

 


नगर प्रतिनिधी दि, 10 

भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या आधिपत्याखाली असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेच्या चिंचवड शाखेत 22 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी  नगरमध्ये दाखल झाले असून ते त्यांच्या मागावर आहे तर दुसरीकडे तीन कोटी रुपयांच्या चिल्लर घोटाळ्याप्रकरणी आज दुसऱ्या दिवशी सुद्धा नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने बँकेच्या मुख्यालयात धाड टाकून पुन्हा चौकशी सत्र सुरू केले आहे, काही कागदपत्रे सुद्धा त्यांच्या हाताशी लागले आहेत


22 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पुणे येथील पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने चार जणांना अटक केली होती, तत्कालीन संचालक नवनीत सुरपुरीया, यज्ञेश चव्हाण, आशुतोष लांडगे, जयदीप वानखेडे या चौघांना अटक करण्यात आलेले आहे, यातील लांडगे व वानखेडे यांना दि, 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे तर उर्वरित दोन जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे,22 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणाची पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने कसून चौकशी सुरू केली आहे, या प्रकरणांमध्ये माजी संचालक तसेच पदाधिकारी यांचा सुद्धा समावेश आहे, फरार माजी संचालकांचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून शोध घेतला जात आहे, या विभागाचे एक पथक नगरमध्ये तळ ठोकून आहे, अनेकांच्या घराची झाडाझडती सुद्धा केलेली आहे तसेच 22 कोटी रुपयांच्या संदर्भात जे खाती  आहेत त्याची सुद्धा तपासणी सुरू केली आहे त्यांच्या खाते उतारा सुद्धा या पथकाने ताब्यात घेतलेला आहे, नेमके व्यवहार कशामुळे झाले कसे झाले यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याची सुद्धा माहिती घेण्याचे काम या विभागाने सुरू केले आहे,या घोटाळा मध्ये तत्कालीन संचालक मंडळ व अधिकाऱ्यांचा समावेश असल्यामुळे व या प्रकरणांमध्ये चार जणांना अटक झाल्यानंतर आणि त्यांचे धाबे दणाणले आहेत, नगर जिल्ह्यामध्ये या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून माजी संचालक हे फरार झाले असून त्यांचे मोबाईल सुद्धा आता बंद झालेले आहेत, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक त्यांच्या शोधार्थ नगरमध्ये तळ ठोकून आहे,


या संदर्भामध्ये पिंपरी-चिंचवड  आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अधिकारी वसंत बाबर यांनी सांगितले की,आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला असून जी कागदपत्रे आमच्या हाताची लागलेले आहेत, त्याची माहिती घेऊन अन्य कागदपत्रे सुद्धा आम्ही मिळवत आहोत, गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले,


चौकट

तीन कोटी रुपयांच्या चिल्लर घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केली असून आज दुसऱ्या दिवशी आम्ही कागदपत्र पडताळणीसाठी बँकेमध्ये आले आहोत तसेच बँकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी सुद्धा सुरू केली आहे तसेच या प्रकरणांमध्ये कोण कोण सहभागी आहे याचा सुद्धा शोध घेतला जात आहे तसेच कागदपत्रांची पडताळणी सुद्धा आम्ही करत असल्याचे नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस निरीक्षक  ज्योती गडकरी यांनी सांगितले

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only