Friday, March 19, 2021

बाळ बोठे याची दोन दिवसापासून सखोल चौकशी सुरू झाली


 


नगर दिनांक 19 प्रतिनिधी 


रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याची दोन दिवसापासून सखोल चौकशी सुरू झाली असतानाच आज त्याच्या घराची झाडाझडती घेऊन अनेक गोष्टी पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. दरम्यान उद्या आरोपी बोठे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे त्याला पारनेर न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे.


रेखा जरे हत्याकांड मध्ये दहा आरोपी  चा समावेश आहे, यातील मुख्य आरोपी पत्रकार बोठे हा तीन महिन्यांपासून फरार होता, त्याचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून तपासणी सुरू केली होती. सुरुवातीला तीन दिवस तो या घटनेबद्दल काहीच सांगायला तयार नव्हता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासमोर हजर केले असता तीन दिवसानंतर बोलू लागला. या घटनेसंदर्भात काही माहिती सुद्धा त्यांनी पोलिसांना दिली असल्याचे पुढे आले आहे.


काल पोलिसांनी नगर शहरामध्ये विविध ठिकाणी आरोपी घेऊन त्याची चौकशीही केली होती. त्याच्याकडे हस्तगत झालेली बॅग ही नेमकी कुठून कशी आली होती याचा छडा या चौकशीमध्ये लावण्यात आला आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी त्याला नेले होते त्या ठिकाणी त्या याची माहिती घेतली व चौकशी मध्ये काही माहिती त्याने दिली होती.


आज आरोपी बोठे याच्या घराची झाडाझडती आज आरोपीच्या देखत घेण्यात आली. घरामध्ये काही वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या असून त्यांनी हस्तगत केल्या आहे. त्याच्याकडून या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती पोलीस गेल्या दोन दिवसांपासून घेत आहे. अनेक माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे.


बोठे याला अटक केल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या दिनांक 20 रोजी संपत आहे. पोलीस कोठडी मध्ये विविध माहिती पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अन्य काही बाबीसुद्धा पोलिसांना द्यायचे आहेत. तसेच तपास सुद्धा अजून करायचा आहे. उद्या न्यायलयामध्ये पोलिस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे त्याला हजर केले जाणार आहे. त्या वेळेला काय युक्तिवाद होतो याकडे लक्ष लागले आहे.


चौकट

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बोठेने पत्र पाठवले आहे. ही बाब प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर अण्णा हजारे यांच्या कार्यालयाकडून याचा इन्कार करण्यात आलेला आहे. पोलीस यंत्रणेकडे सुद्धा या बाबतची कोणतीच माहिती नाही.चौकट


बोठे याच्याकडे असलेला आयफोन हा उघडत नसल्यामुळे कालपासून सायबर सेलने प्रयत्न केला. मात्र तो न उघडल्यामुळे आता येत्या दोन दिवसांमध्ये तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फोनमधली अधिक माहिती कळल्यानंतर तपासाची सूत्रे त्या दिशेने फिरणार आहेत.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only