Friday, March 5, 2021

मुंबई पोलिसांवर विश्वास सगळ्यांनी ठेवला पाहिजेनगर दिनांक 6 प्रतिनिधी 


सरकार येत असते, जात असते मात्र मुंबईचे पोलीस तेच असतात त्यांची कार्यपद्धती अतिशय चांगली आहे, विरोधकांनी विरोध जरी केला असला तरी पोलिसांवर विश्वास सगळ्यांनी ठेवला पाहिजे. मुंबई येथील हिरेन व्यापाऱ्यांच्या हत्येप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास एटीएस कडे दिलेला आहे तो तपास योग्य पद्धतीने होईल असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना केले.


नगर येथील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते .यावेळी मंत्री शंकरराव गडाख, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन आदी या वेळी उपस्थित होते.


मंत्री थोरात म्हणाले, हिरेन प्रकरणात तपास कोणाकडे कसा द्यायचा या संदर्भामध्ये गृह विभागाला अधिकार आहे. घटना का घडली, कशी घडली, यासंदर्भात  त्या पद्धतीने त्यांनी तो तपास दिलेला आहे, मुंबई येथील व्यापारी हिरेन यांच्या संदर्भातील चौकशी  करतील , सध्या या घटनेचा एटीएस कडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यानी दिली आहे, मुंबई पोलीस तपास करण्यामध्ये सक्षम आहे. सरकार कोणाचे असो वा नसो मुंबई पोलीस हे नेहमीच चांगल्या पद्धतीनेच काम करत असतात, त्यांच्यावर सगळ्यांनीच विश्वास ठेवला पाहिजे ,या घटनेचा तपास योग्य पद्धतीने होईल असेही थोरात यांनी यावेळी सांगितले.नाशिक येथील स्टॅम्प घोटाळा संदर्भात विचारले असता, त्याची चौकशी सुरू आहे. काही बाबी त्यामधून आलेल्या आहेत निश्चितपणे कारवाई होईल असेही मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.


नगरच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालय संदर्भात विचारले असता, मीच त्यावेळी महसूल मंत्री असताना या इमारतीचे काम सुरू केले होते, थोडे फार काळ रेंगाळले आहे, ही वस्तुस्थिती आहे .मात्र आता हे काम पूर्णत्वाला कशा पद्धतीने जाईल याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. साधारणता 1 मे रोजी या वास्तूचे उद्घाटन झाले पाहिजे असे आमचा मानस आहे. या नियोजित वास्तू साठी 28 कोटी रुपयांची प्राशशकीय तरतूद केली होती, आता याचे काम पाहतात आता पन्नास कोटी रुपयांच्या पर्यंत तरतूद करण्यात आली आहे. ही वास्तू अतिशय सुंदर अशी होणार आहे व ती नगरच्य वैभवात भर घालणारी होईल, लवकरात लवकर काम पूर्णत्वाला कसे जाईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असल्याचेही महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले. नगर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड करता आम्ही सगळे एकत्र बसत आहोत लवकरच नाव निश्चित केले जाईल असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only