Sunday, March 7, 2021

त्या दोन आरोपींना नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडीनगर,दि 7 प्रतिनिधी


- नगर अर्बन बँकेच्या चिंचवड (पुणे) शाखेतील 22 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल पहाटे नगर शहरात छापा टाकून बँकेच्या एका तत्कालीन संचालकाला व इतर एकास अटक केल्यानंतर त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहे. दरम्यान या घटनेनंतर नगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली असून बँकेचे माजी संचालक यांना आता शोधण्याचा प्रयत्न पोलिसांच्या कडून सुरू झाला  आहेत .काल या याप्रकरणी नवनीत सुरपुरिया व यज्ञेश चव्हाण या दोघांना अटक केली होती, दरम्यान बँकेचे माजी संचालक व अधिकारी सामील असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. काल पकडलेल्या दोन आरोपींना दिनांक नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.


 पिंपरी- चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्यासह त्यांच्या पथकाने काल नगर शहरामध्ये धडक कारवाई सुरू केली होती. या कारवाईची माहिती स्थानिक बँकेच्या पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर माजी संचालक मात्र नगरमधून फरार झाले.

कर्ज प्रकरणात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेची 22 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. 26 मार्च 2018 ते 25 जानेवारी 2021 या दरम्यान पावर हाऊस चौक, चिंचवड येथील बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला होता. याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. 


बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, नगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, तसेच बँकेचे संचालक मंडळ सदस्य, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय 56, रा.नगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. या गुन्ह्यात बँकेचे तत्कालीन संचालक मंडळही आरोपी असल्याने त्यांच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांचे पथक काल पहाटेच नगरमध्ये दाखल झाले. ज्या आरोपीला अटक केली त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यास सुरुवात झालेले आहे. त्यांचे जबाब सुद्धा घेण्यात आलेले आहेत. तसेच या प्रकरणामध्ये अन्य कोणा कोणाचा सहभाग आहे याची सुद्धा माहिती बँकेच्या कडून घेतली जात आहे.


 याप्रकरणात आरोपी असलेल्या तत्कालीन संचालकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली . पोलिस येणार असल्याची माहिती मिळाल्याने अन्य आरोपी फरार झाले आहेत. सध्या बँकेचे संचालकमंडळ बरखास्त करण्यात आलेले असून प्रशासकामार्फत कारभार पाहिला जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांचे पथके नगरला आले. त्यांनी काही ठिकाणी शोध मोहीम राबविली. आज सुद्धा काही माजी संचालकांच्या घराची सुधा चौकशी केलेले आहे. मात्र त्या ठिकाणी कोणी आढळून आलेले नाही. विशेष म्हणजे या बँकेचे माजी अध्यक्ष तसेच संचालक मंडळ या घटनेमध्ये असल्यामुळे वेळप्रसंगी आरोपींची नावे सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.


दरम्यान या संदर्भात पुण्याच्या पुणे चिंचवड येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आम्ही इतर आरोपींचा शोध घेत आहोत. अनेकांची चौकशीही सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only