Saturday, March 13, 2021

चार आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

 नगर दिनांक 13 

नगर अर्बन बँकेच्या चिल्लर घोटाळा प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना दोन दिवसांची म्हणजे दि 15  पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. दरम्यान आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कडून अकरा माजी संचालकांना आज म्हणण मांडण्यासाठी बोलवण्यात आले होते एकही जण उपस्थित न राहिल्यामुळे आता उद्या पुन्हा एक संधी देण्यात येणार आहे.नगर अर्बन को-ऑपरेटिव बँक यामध्ये तीन कोटी रुपयांच्या चिल्लर घोटाळा उघडकीला आल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने याचा तपास सुरू केला होता. बँकेने कागदपत्रे न दिल्यामुळे तेथे धाड टाकून कागदपत्र मिळवली व या प्रकरणी काल चार जणांना अटक करण्यात आली होती, यामध्ये

 अर्बन बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक घनश्याम बल्लाळ यांच्यासह राजेंद्र हुंडेकरी, प्रदीप पाटील, स्वप्नील बोरा  यांचा आरोपींमध्ये समावेश असून त्यांना अटक करण्यात आली होती.


पकडलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उप अधीक्षिका प्रांजल सोनवणे यांनी न्यायालयामध्ये बाजु  मांडली, या घटनेचा आम्हाला सखोल तपास करायचा आहे ,आम्ही काही कागदपत्रे सुद्धा हस्तगत केले आहे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे तसेच यामध्ये अजून कोण कोण सामील आहेत याचा आम्हाला तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .


दरम्यान,नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तीन कोटी रुपयांचा चिल्लर घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने बँकेच्या माजी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना आज दिनांक 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.


यामध्ये भाजपचे माजी खासदार तथा माजी अध्यक्ष दिलीप गांधी, अजय बोरा अनिल कोठारी, दीपक गांधी, शैलेश मुनोत,किशोर बोरा, संजय लुनिया, केदार केसकर साधना भंडारी, मनिष साठे तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नवनित गांधी यांचा समावेश आहे


आज ज्याना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यापैकी माजी संचालक केदार केसकर हेच फक्त हजर राहिले होते बाकी अन्य कोणीही आज उपस्थित राहिलेले नाही.


या संदर्भामध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उप अधीक्षिका प्रांजल सोनवणे यांनी आम्ही नोटिसा बजावल्या यातील चार जणांनी नोटिसा घेतलेल्या नाही, बाकीच्यांनी घेतल्या ज्यांनी नोटिसा घेतलेला नाही त्यांच्या घरावर आम्ही नोटिसा चिटकलेल्या आहेत .आज जरी कुणी उपस्थित राहिले असले तरी आम्ही त्यांना एक संधी उद्या पुन्हा देणार आहोत असे सांगितले तसेच या घटनेचा तपास आम्ही सुरु केल्यानंतर आम्हाला काही महत्त्वाचे धागेदोरे सुद्धा हाती लागले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only