Tuesday, March 9, 2021

शिवशाही बसवर आदळल्याने दुचाकीस्वार ठार !

 


शिवशाही बसवर आदळल्याने दुचाकीस्वार ठार !

  धाव वेगाने जाणाऱ्या एस. टी. महामंडळाच्या शिवशाही बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात तोल सुटून बसवर आदळून झालेल्या या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर दोन जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील घारगाव परिसरात काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
 

शिवशाही बस क्रमांक एमएच १४ जीयू ०६४२ ही नाशिक -पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. ही बस घारगावजवळील हॉटेल लक्ष्मी परिसरात आली असता या बसवर मोटारसायकल क्रमाक एमएच १७ बीए ४०८६ आदळली. 

या मोटारसायकलवरुन तीनजन बसुन घारगावकडून कुरकुटवाडीकडे जात होते. या अपघातात मोटारसायकलचालक तान्हाजी देवराम पवार (वय ४०, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) हा जागीच ठार झाला. 

तर मोटारसायकलवर बसलेला सुरेश मोहन पवार (वय २८, रा. कुरकुटवाडी) हा गंभीर जखमी झाला. या अपघातात संतोष दादाभाऊ माळी (वय ३८) यालाही मार लागला. 

अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, हेड कॉन्स्टेबल दिवटे, पोलीस नाईक रमेश शिंदे, मनेश शिंदे, गिरी, बर्डे, सोनवणे हे घटनास्थळी पोहोचले. जखमींना त्वरीत रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only