Wednesday, March 10, 2021

गाडी मध्ये 2000 बॉक्स बियर

 


घोडेगाव मध्ये बियरचा कंटेनर पलटी . नगर औरंगाबाद मार्गावर झाला अपघात ; गाडी मध्ये 2000 बॉक्स बियर

घोडेगाव ( नेवासा )


बियरचे 2000 बॉक्स घेऊन जाणारा कंटेनर घोडेगाव ( शनिचौक ) येथे मध्यरात्री पलटी झाला.त्यात मोठे नुकसान झाले असल्याचे समजले .


या बाबत अधिक माहिती अशी की वाळुंज पंढरपूर ( औरंगाबाद ) येथून टुबर्ग कंपनीची बियर कोल्हापूर या ठिकाणी पोहोचवण्यासाठी निघालेला कंटेंटर क्रमांक MH 26 AD 7642 हा शनिचौक – घोडेगाव ता – नेवासा येथून जात असताना समोर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व एक टँकर यांच्यात किरकोळ अपघात झाला होता , अचानक समोर आल्याने अपघात टाळण्याच्या प्रयत्नात गाडी कंट्रोल न झाल्यामुळे हा कंटेनर पालटला .ट्रॅक्टर व टँकर चौकात उभे आहेत .शनिचौक घोडेगाव येथे उलटलेला ट्रक कंटेनर

या कंटेनर मध्ये 2000 बॉक्स टूबर्क बियर अंदाजे किंमत 45 लाख रुपये  .याच वेळी त्या ठिकाणाहून सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे व त्यांचे सहकारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना ही अपघात झाल्याची बाब लक्षात आली त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ 2 पोलीस तैनात केल्यामुळे थोड्या फार प्रमानात बियर चोरी झाली .पोलीस आल्यामुळे बियरची चोरी रोखता आली .अनेक ठिकाणी दारूच्या पलटी झालेल्या ट्रक मधून दारू चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत .पोलीस तैनात असल्याने तळीरमांची घोर निराशा झाली . दरम्यान दुपारी 1 वाजल्यापासून अपघातग्रस्त कंटेनर मधून दुसऱ्या ट्रक मध्ये बियरचे बॉक्स भरण्याचे काम सुरू होते

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only