Friday, March 12, 2021

जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक उतरले रस्त्यावर

 


नगर,ता.12- प्रतिनिधी


 मास्क नसणार्‍यांवर धडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे आज रस्त्यावर उतरले. नगर शहरातील कापडबाजार येथे दुपारी ही मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर नगर पुणे बस स्थानक यासह जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये धडक कारवाई  करण्यात आली असून दंडही ठोठावला आहे. दरम्यान .दुकानदार करोना नियमांची अंमलबजावणी करत नसतील तर संबंधितांचे एक महिन्यासाठी दुकाने बंद ठेवू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिला. तसेच नियमांचे उल्लंघन केले नाही तर लोकं शिवाय पर्याय राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले तर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दंडात्मक कारवाई करून लग्न समारंभात जर नियमांचे उल्लंघन केले तर नव वधू-वरांवर सुद्धा पुणे दाखल होतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मास्क बंधनकारक करण्यात आलेला आहे. तसेच 500 रूपये दंडात्मक कारवाईचे आदेश देखील दिलेले आहेत. मात्र, मास्कबाबत नागरिकांमध्ये निष्काळजीपणा दिसत आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले व पोलिस अधीक्षक पाटील यांनी आज अचानक कापड बाजार येथे येऊन मास्क नसणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे, मनपाचे वैद्यकिय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते. 


नगर शहर व जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सतर्क झालेले आहे.गेल्या काही दिवसांपासून नगरमध्ये पोलिसांनी मास्क नसणार्‍यांविरूध्द दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले व पोलिस अधीक्षक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नगर- संभाजीनगर रस्त्यावरील तीन मंगलकार्यालयावर कारवाई केली होती. 


डॉ. भोसले व पाटील यांनी  कापड बाजारातील काही दुकानांमध्ये बाहेरगावाहून नागरिक खरेदीसाठी आलेले होते. विनामास्क आढळून आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच दुकानदारांना सुद्धा पोलीस अधीक्षक पाटील यांनी तंबी देऊन कोणी विनामास्क खरेदी करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, त्यास दुकानदार जबाबदार राहील असा इशारा दिला. त्यानंतर पुणे बसस्थानकामध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली तसेच एसटी मध्ये कोणी मास्क लावले नाही याची समक्ष जाऊन त्यांनी पाहणी केली व जे विनामस्क आढळून आले  त्यांच्यावर शोधात दंडात्मक कारवाई केली आहे.


यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांनी, आम्ही प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने पाहणी करणार आहोत. नागरिकांनी जर नियमांचे उल्लंघन केले तर आम्हाला लॉकडाऊन परवडणार नाही असे त्यांनी सांगितले. शाळेच्या संदर्भामध्ये आम्ही आठ दिवस वाट पाहणार आहोत. तसेच संस्थाचालक यांच्याशी बोलणी सुद्धा सुरू आहे. वेळप्रसंगी शाळा बंद करण्यासंदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. दंडात्मक कारवाई हा काही आमचा उद्देश नाही मात्र, सर्वांना जे काही नियम आखून दिले आहेत त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. आगामी काळामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा सुद्धा जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिला.


जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 16 हजार लोकांकडून 28 लाख रुपयांचा दंड वसूल केल्या असल्याचे सांगितले. नगर शहरातील तेलीखुंट, माळीवाडा भागात असणार्‍या बसस्थानकाला सुद्धा यावेळी त्यांनी भेटी दिल्या आहेत. मंगल कार्यालयाच्या संदर्भात आम्ही मागील आठवड्यापासून मोहीम चालू केली आहे. आत्ता 44 लग्न नगर शहरामध्ये आहेत. आम्ही पोलिसांकडून या लग्नाची व्हिडिओ शूटिंग सुद्धा घेणार आहोत. जर आम्हाला नियमांचे उल्लंघन झालेले आढळून आले तर आम्ही संबंधितांवर तसेच वधू-वरांवर सुद्धा कारवाई करणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. दंडात्मक कारवाई करणे हा आमचा उद्देश नाही मात्र लोकांनी नियमांचे पालन करावे हा त्यामागचा उद्देश आहे. जो पाचशे रुपयांचा दंड होता तो आता दोनशे रुपयेवर करण्याचा सुद्धा आम्ही निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only