Tuesday, March 9, 2021

वर्ष श्राद्ध सुरू पोलिसांनी संबधीत ना केला 10 हजाराचा दंड

 


तोफखाना पोलीस पथकाने सकाळी केली मंगल कार्यालयाची तपासणी ।तपोवन रोडवरील एका घरासमोर गर्दी दिसली तेथे वर्ष श्राद्ध सुरू होते पोलिसांनी संबधीत ना केला 10 हजाराचा दंड वसूल केला आहे. जिल्ह्यातील करोना परिस्थिती गंभीर होत चालली असून  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता जिल्ह्यातील लग्न समारंभ व रेस्टॉरंट मधील गर्दी बाबत कडक पावलं उचलण्याची तयारी चालविली आहे. येत्या काळात लग्न समारंभ असलेल्या ठिकाणी पोलिस नियुक्त केले जाणार असून चित्रीकरणही केलं जाणार आहे. याशिवाय हॉटेलचीही अचानक छापे टाकून तपासणी केली जाणार आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only