Wednesday, March 10, 2021

माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,

 


नगर दि 10 प्रतिनिधी - नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळा प्रकरणातील कागदपत्र बँकेने पोलिसांना दिली नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाठवून कागदपत्रे ताब्यात घेण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,


अधीक्षक पाटील म्हणाले की नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी संदर्भामध्ये पोलिसांनी त्या त्या वेळेला गुन्हे दाखल केले आहेत तपासामध्ये कोणतीही त्रुटी आढळून नये व त्याचा फायदा इतरांना होऊ नये या उद्देशाने प्रत्येक कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये जो गुन्हा दाखल झाला होता त्याची कागदपत्रे बँकेने पोलिसांना दिली नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून उच्च अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून कागदपत्रांची पडताळणी तसेच माहिती घेण्याचे आदेश दिले असून त्यानुसार ही कारवाई सुरू असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले


आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत किंवा जे खटले दाखल झालेले आहेत त्यांची संख्या 93 आहे आतापर्यंत 28 प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत कागद पडताळणी तसेच तपासामध्ये वेळ लागतो ही वस्तुस्थिती आहे मात्र अधिकाधिक तपास कशा पद्धतीने पुढे जाईल या करता आम्ही त्यांना अतिरिक्त अधिकारी वर्ग देणार असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले


श्रीरामपूर येथील व्यापारी हिरण यांच्या हत्या प्रकरना मध्ये पोलिसांनी अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली असून काही धागेदोरे सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेले आहे मात्र ही हत्या कशामुळे झाली काय झाली हे अद्याप पर्यंत कळू शकले नाहीतत्यामुळे या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले या घटनेचा तपास हा उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.


दरम्यान जरे हत्याकांड प्रकरणासंदर्भात फरार आरोपी बोठे याच्या संदर्भामध्ये विचारले असता पोलीस तपास करत आहे अद्याप पर्यंत त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only