Thursday, March 4, 2021

डिझेल, ऑइल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..*दोघांना अटक..*

 दिनांक 27/02/21 रोजी दुपारी 12/00 वा च्या सुमारास राशीन पोलीस दुर क्षेत्र येथे सिद्धटेक येथील विद्युत सब टेशन वरील इंजिनियर संतोष मुरदंडे रा. दौन्ड  यांनी तक्रार दिली की मागील काही दिवसा पासुन आमच्या सबस्टेशन वरील ऑईल कोणी तरी अज्ञात चोरी करत आहे.

त्यावरून मार्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 त्यानंतर कर्जत पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री - चंद्रशेखर यादव साहेब यांनी सदर आरोपी आणि मालाचा शोध घेण्याबाबत वेळोवेळी आदेश दिले होते.

गोपनीय माहिती वरून पोलीस जवान मारुती काळे, सागर म्हैंत्रे, भाऊसाहेब काळे, गणेश ठोंबरे, गणेश भागडे , संपत शिंदे यांनी सिद्धटेक परिसरातुन

*आरोपी-*

1 ) अमोल नामदेव जाधव वय -21 वर्ष,

2 ) पप्पु कुमार साहु वय -31 वर्षे दोन्ही रा. सिध्दटेक 

यांना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याबाबत सखोल विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना सध्या 5 दिवस पोलीस रिमांड मिळाला असुन त्यांनी चोरलेले 13,200 रु किमतीचे अपार कंपनीचे *110 लिटर ऑईल जप्त* केले आहे. पोहेकॉ मारुती काळे हे पुढील तपास करित आहेत. राशीन, सिद्धटेक परिसरात 

गेल्या काही दिवसांपासून डिझेल, ऑइल चोरी जात होते. त्याबाबत सुद्धा अधिक तपास करण्यात येत आहे..


*सदरची कारवाई* मा. पोलीस अधीक्षक . मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक . सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब जाधव, कर्जत पोलिस स्टेशन चे चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ दिवटे, पोलीस जवान मारुती काळे, सागर म्हैंत्रे, भाऊसाहेब काळे , गणेश ठोंबरे , गणेश भागडे , संपत शिंदे यांनी केली..

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only