Thursday, March 4, 2021

निषेधार्थ मुलगा व त्यांची आई चा उपोषण सुरू

 नगर दिनांक 5 प्रतिनिधी यशस्वी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा तपास लागला नाही,  या निषेधार्थ जरे यांचा मुलगा व त्यांची आई यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.यशस्वीनी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांची हत्या होऊन 90 दिवस उलटून गेलेले आहे, या प्रकरणांमध्ये पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलेली आहे. या घटनेमध्ये मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा समावेश आहे .हत्या होऊन नव्वद दिवस उलटून गेले तरीही बोठे याचा शोध लागला त्यांनाही जे पाच आरोपी अटकेत आहे त्याच्या संदर्भात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलेले आहे. कालच पारनेर येथील न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे.


बोठे याचा ठावठिकाणा लागत नसल्याने आठ दिवसापूर्वी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व  जिल्हाधिकारी  राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज  रेखा जरे यांच्या आई सिंधू वाईकर ,रुणाल जरे व गोरख आढाव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only