Saturday, March 6, 2021

.अपहरण झालेला बेलापूर येथील व्यावसायिक मृतावस्थेत आढळलानगर  :

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या  गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून आला.


हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी त्यांचा यापूर्वीच घातपात केला असण्याची दाट शक्यता आहे. 

हिरण यांच्या अपहरणानंतर बेलापूर येथे शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. घटनेची गावात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अधिवेशनात याप्रकरणी गृहमंत्र्यांना प्रश्न उपस्थित केला होता. श्रीरामपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देत हिरण यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी केली होती.


यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी शनिवारी बेलापूर येथे जात प्रकरणाची माहिती घेतली. तसेच हिरोनी यांचा लवकरच तपास लागेल असे त्यांनी सांगितले होते.


दरम्यान आज सकाळी हिरण यांचा मृतदेह सापडल्यानंतर आता नगर वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे तीन ते चार पथके श्रीरामपूर कडे रवाना झाली आहे. यापूर्वी दोन पथके त्यांचा शोध घेत होती. आता एकूण पाच पथकामार्फत आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only