Thursday, March 4, 2021

सिद्धार्थनगरमध्ये रस्ता कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ सिद्धार्थनगरच्या विकासासाठी कटिबद्ध : नगरसेविका शिला चव्हाण दलित वस्त्यांच्या विकासासाठी राज्यशासन व महापालिकेच्या माध्यमातून मोठा

निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. विकास

कामाचे नियोजन करुन नवीन आराखडा तयार केले आहे. त्या माध्यमातून जसा निधी उपलब्ध

होईल, त्याप्रमाणे दलित वस्तीतील कामे मार्गी लावणार आहे. शासनाकडून दलित वस्तीचा निधी

मोठ्या प्रमाणात महापालिकेस मिळत असतो, तो निधी महापालिकेने दलित वस्त्यांच्या

विकासाकामांसाठी वापरावा. सिद्धार्थनगरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन

नगरसेविका शिलाताई दीप चव्हाण यांनी केले.


नगरसेविका शिलाताई दीप चव्हाण यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र. ९ मध्ये सिद्धार्थनगर

मधील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ झाला. यावेळी अभिजित चिप्पा, प्रा. जयंत

गायकवाड, कमलाकर गायकवाड, नितीन कसबेकर, सुमेध गायकवाड, मनोज रणमाळे, ज्योती

गायकवाड, नंदाताई गायकवाड, अतुल सोनवणे, मीना गायकवाड, मिनाक्षी गायकवाड, अश्‍विनी

गायकवाड, आकाश गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, योहान गायकवाड, अनिता शर्मा आदी

उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना शिला चव्हाण म्हणाल्या की, प्रभागाच्या विकासकामाबरोबरच

प्रभागातील नागरिकांच्या वैयक्तिक प्रश्‍न सोडविण्याचे काम केले जात आहे. व्यक्तीगत लाभाच्या

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाते. सिद्धार्थनगरमधील बहुतांशा

रहिवासी हे महापालिकेचे कर्मचारी आहेत. त्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडविणे हे आमचे कर्तव्य

असल्याचे ते म्हणाले.

नगर : नगरसेविका शिलाताई दीप चव्हाण यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र. ९ मध्ये

सिद्धार्थनगर मधील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ झाला. यावेळी अभिजित चिप्पा, प्रा.

जयंत गायकवाड, कमलाकर गायकवाड, नितीन कसबेकर, सुमेध गायकवाड, मनोज रणमाळे,

ज्योती गायकवाड, नंदाताई गायकवाड, अतुल सोनवणे, मीना गायकवाड, मिनाक्षी गायकवाड,

अश्‍विनी गायकवाड, आकाश गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, योहान गायकवाड, अनिता शर्मा

आदी उपस्थित होते, (छाया : लहू दळवी)

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only