Thursday, March 4, 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांची सभापती पदी निवड अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांची आज दुपारी निवड झाली.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी अविनाश घुले व सेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनी अर्ज दाखल केले होते.

सेनेचे पठारे यांनी त्यांचा अर्ज माघारी घेतला. त्यानंतर घुले यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.

सेना नेत्यांच्या आदेशाने पठारे यांनी अर्ज माघारी घेतल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only