Sunday, March 7, 2021

नामदार थोरात यांच्या 1 कोटी 28 लाखांचा निधी


 नामदार थोरात यांच्या प्रयत्नातून चिखली ते नळवाडी म्हाळुंगी पुला करीता 1 कोटी 28 लाखांचा निधी मंजूर

संगमनेर प्रतिनिधी

रायाचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात वाडीवस्तीवर विकासाचा वेग कायम असून चिकणी वळवाडी यादरम्यान म्हाळुंगी नदी वरील पुलासाठी नव्याने 1 कोटी 28 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देतांना ते म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील विविध वाडीवस्तीवर सातत्याने विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यातील प्रत्येक गावात पक्के रस्ते , डांबरीकरण , मजबुतीकरण यासह विविध शाळा, सिमेंट बंधारे यांचे काम सुरू आहे पश्चिम भागातील सिन्नर तालुका व संगमनेर तालुका यांच्या दरम्यान महत्त्वाचा असणारा चिकणी ते नळवाडी दरम्यान चा म्हाळुंगी नदीवरील पूल हा अत्यंत गरजेचा होता म्हणून या परिसरातील नागरिकांची सातत्याने या पुलाकरीता मागणी होती.

रायाचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी याकामी विशेष लक्ष घालत या पुलाकरिता  1कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामासाठी इंद्रजीत थोरात त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नव्याने होणार्‍या पुलामुळे पश्चिम भागातील म्हाळुंगी नदीवरील प्रवास करणार्‍या नागरिकांची मोठी सोय होणार आहे.  त्यामुळे चिकणी, डोंगरगाव, चास ,नळवाडी या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only