Tuesday, March 9, 2021

४७६ कोटींची तरतूद

 


महसूलमंत्री नामदार थोरातांच्या प्रयत्नांतून निळवंडे कालव्यांसाठी ४७६ कोटींची तरतूद


२०२२ पर्यंत कामे जलदगतीने होणार


संगमनेर ( प्रतिनिधी ) उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी निळवंडेचे शिल्पकार व राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या अर्थसंकल्पातून ४७६ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे २०२२ पर्यंत कालव्यांची कामे जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.


            उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ गावांमधील सुमारे ६८ हजार ८०० हेक्टर शेतीला या कालव्यांच्या पाण्यामुळे लाभ होणार आहे. या गावांसाठी अनेक अडचणीतून मार्ग काढत नामदार बाळासाहेब थोरात यांनी धरण पूर्ण केले. याच काळात कालव्यांचे कामे ही काही प्रमाणात सुरु केले. कौठे कमळेश्वर,गणेशवाडी,पिंपळगांव कोंझीराचा मोठा बोगदा ही पूर्ण केला. मात्र २०१४ ते २०१९ च्या काळात या धरणाच्या कालव्यांची कामे ठप्प झाली. २०१९ या काळात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच पुन्हा नव्याने या कालव्यांच्या कामांना सुरुवात झाली. प्रथम अकोले तालुक्यातील ० ते २८ किमी या कालव्यांच्या कामाला गती दिली. कोरोनाच्या संकटामुळे कामाची गती मंदावली. अशा काळात ही नामदार थोरात यांनी या कामांवर भेट देवून पुन्हा कामाची गती वाढविली. अकोलेतील शेतकऱ्यांच्या विविध अडचणी वेळोवेळी मार्गी लावल्या. या धरणाच्या कालव्यांची कामे २०२३ पर्यंत पूर्ण करुन या भागाला पाणी देण्याचे नामदार थोरात यांनी उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी संबंधीत विभाग व अधिकाऱ्यांना ही सूचना देण्यात आल्या आहेत. व यासाठी दररोज आढावा घेतला.


            मुख्यमंत्री नामदार उध्दव ठाकरे यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करुन या अर्थसंकल्पात धरणाच्या इतिहासात प्रथमच ४७६ कोटींची भरीव मदत केली आहे. यासाठी जलसंधारणमंत्री नामदार जयंत पाटील यांचेकडे कायम पाठपुरावा केला होता. कोरोनासारखे महाभयंकर संकट असतांनाही या अर्थसंकल्पात निळवंडे धरणासाठी भरीव निधी दिला आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत १०० कोटी व पुढील आर्थिक वर्षात ३७६ कोटींची तरतूद केली आहे. तसेच गरज पडल्यास हिवाळी अधिवेशनात पुरवनीत पुन्हा निधी मागता येणार आहे. यामुळे २०२२ पर्यंत कालव्यांची कामे जलदगतीने मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.


            या ऐतिहासिक निर्णयामुळे १८२ गावांमधील लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून २०२२ पर्यंत कालव्यांची कामे जलदगतीने होणार आहे. असा विश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला आहे.


 नाशिक - पुणे रेल्वेमार्गासाठी निधी


अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक - पुणे २३५ किमीचा जलदगती रेल्वे मार्गासाठी ही १६१३९ कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक,संगमनेर,अहमदनगर,पुणे या भागातील शेती, पर्यटन, शिक्षण, उद्योग, व्यवसाय यांना अधिक गती मिळणार आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only