Thursday, March 4, 2021

पाईपलाईन रोडवरील पामफ्यूम नायट्रोजन एअर सेंटरचा शुभारंभअहमदनगर - 
अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवरील पामफ़्यूल पेट्रोल पंपावर नायट्रोजन एअर सेंटरचा शुभारंभ नुकताच भारत पेट्रोलियमचे गोवा महाराष्ट्र रिटेल हेड रमण मलिक यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी रिटेल हेड वेस्ट के.रवी, अहमदनगरचे टेरेटी मॅनेजर दिनेश गाडगीळ, भारत पेट्रोलियम सेल्स ऑफीसर प्रतिक गायकवाड, दीपक पेट्रोल पंपाचे संचालक अनिल जोशी उपस्थित होते.

पाम़ फ्यूल पेट्रोल पंपाच्या कामकाजाचा यावेळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी आढावा घेत पामफ़्यूल पेट्रोल पंपाचे संचालक योगेश जोशी व त्यांच्या टीमचे त्यांनी कौतुक केले आहे. तसेच या सुविधांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पामफ़्यूल पेट्रोल पंपाने आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहाकांना विनम्र सेवा तसेच तत्पर सेवा ऑटोमॅटिक इंजिन ऑइल चेंजिंग मशीन देखील या पेट्रोल पंपावर बसविण्यात आली.असून या सुविधा ग्राहकांना मोफत देण्यात येतात. एवढंच नाही तर आता नायट्रोजन एअर सेंटरची सुरुवात या पेट्रोल पंपावर झाल्याने भारत पेट्रोलियमच्या ग्राहकांना या सेवेचा फायदा होणार आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only