Thursday, March 11, 2021

शरद पवार आणि हार्दिक पटेल यांची मुंबईत भेट

 


शरद पवार आणि हार्दिक पटेल यांची मुंबईत भेट


मुंबई : गुजरातमधील स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर आता गुजरातचे काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि युवा नेते हार्दिक पटेल  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे


हार्दिक पटेल मुंबई दौऱ्यावर आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हार्दिक पटेल यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. हार्दिक पटेल आणि शरद पवार यांची ही भेट राजकीय असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. कॉंग्रेसमध्ये हार्दिक पटेल यांच्या नेतृत्व गुणाचा आणि त्यांच्या ऊर्जेचा योग्य वापर केला जात नसल्याचे बोलले जात आहे. 


हार्दिक पटेलने व्यक्त केली खंत


कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे हार्दिक पटेल यांनी अनेकदा सांगितले आहे. मात्र, गुजरात काँग्रेस काळासोबत जायला तयार नसल्याची खंत हार्दिक पटेल यांनी व्यक्त केली आहे. आगामी काही दिवसांमध्ये हार्दिक पटेल यांना गुजरातमध्ये मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत असून, या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भेट राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशी मानली जात आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only