Monday, March 29, 2021

अडीच कोटीच्या 16 गाड्या पोलिसांनी केल्या हस्तगत- भाडे देण्याच्या आमिषाने परस्पर ठेवल्या होत्या गहाण
 नगर दि 29 प्रतिनिधी


टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनींकडून वाहने भाड्याने चालविण्यासाठी घेवून सदरची वाहने परस्पर गहाण ठेवून फसवणूक करणारा आरोपी जेरबंद करुन २,६९,००,०००/ -रु. किं. च्या १६ अलिशान कार जप्त केल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके  यांनी पत्रकारांशी बोलताना दिली .दरम्यान अन्य गाड्यांचा शोध सुद्धा लावणार असून यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.


या प्रकरणामध्ये सध्या एकच आरोपी असून त्या आरोपीचे नाव दादा उर्फ शशिकांत मारुती सातपूते, रा. भोयरे गांगरडा, ता. पारनेर आहे, यात त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत काय, याचा शोध पोलीस घेत आहे.


या बाबतची माहिती अशी की, फिर्यादी महेश प्रताप खोबरे, वय- ४० वर्षे रा.बी-५०४, गगन रेनाई सन्स जवळ, धर्मावत पेट्रोल पंप, पिसोळ, जि- पुणे यांचा टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.आरोपी याने फिर्यादी यांचेकडून मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये इनोव्हा क्रिस्टा, इटीगा, झेस्ट अशा एकूण २२ कार महाबली एन्टरप्रायजेस या नावाने फिर्यादी यांचेकडून भाड्याने चालविण्यासाठी घेतलेल्या होत्या. पैकी ९ कार आरोपी याने फिर्यादी यांना परत केल्या. परंतू उर्वरित १३ कारचे भाडे व सदरच्या १३ कार फिर्यादी यांना परत केल्या नाहीत. तसेच सदर कार बाबत काही एक माहिती फिर्यादी यांना न दिल्याने फिर्यादी यांनी सुपा पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन  भादवि कलम ४२० प्रमाणे आरोपी शशिकांत सातपूते याचे विरुध्द दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्ह्याचा गांभिर्य लक्षात घेवून  पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास अनिल कटके (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा) यांचेकडे हस्तांतरीत करुन तपासाबाबत सुचना दिल्या.


 त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, सफौ नानेकर,  सुरेश माळी, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, दिपक शिंदे ,रविन्द्र घुंगासे, मयूर गायकवाड, रोहोत येमूल, रणजित जाधव, मेघराज कोल्हे, चालक घोहेकॉ उमाकांत गावडे, संभाजी कोतकर अशांनी मिळून सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला. तपासामध्ये आरोपी दादा उर्फ शशिकांत मारुती सातपूते, वय- २६ वर्षे, रा. भोवरे गांगर्डा, ता. पारनेर याचा शोध घेवून त्यास गुन्ह्यात अटक करुन त्याची पारनेर न्यायालयाकडून वेळोवेळी पोलीस कस्टडी घेण्यात आली.


 पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडून १) इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच-१२-क्युजी-७२३६. २) इनोका क्रिस्टा कार नं. एमएच-१२-क्युजी-४९५०, ३) इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच-१२-क्युडब्ल्यू-८७९३, ४) इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच-१२-पीक्यु-८५१५, ५) टाटा झेस्ट कार नं. एमएच-१२-एसएफ-५२९२, ६) इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच १क्युडब्ल्यू-८६२८, ७) स्विफ्ट कार नं. एमएच-१४-जीडी-७४८७.८) इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच-१२-क्यूजी- ७२३६ तसेच या व्यतिरिक्त इतर ट्रॅव्हल्स कंपणीकडून घेतलेल्या ९) एसोस कार नं. एमएच-१६-बीवाय-५६४०, ९) स्कार्पिओ जिप नं. एमएच-२२-एडी-९१११, १०) इनोव्हा कार नं. एमएच-१७-एझेड- ५४६४, ११) बीएमडब्ल्यू कार नं. एमएच-१४-डीएक्स-५३५२, १२) बीएमडब्ल्यू कार नं. एमएच-४३-एजे-०५२५, १३) बीएमडब्ल्यू कार नं. एमएच ०२-बीजी-२१००, १४) बीएमडब्ल्यू कार नं. एमएच-१४-डीक्यू-१९३३, १५) स्विफ्ट डिझायर कार नं. एमएच-४२- के ४३२८ व १६) इनोव्हा कार नं. एमएच-१४-सीएक्स-८९१९ अशा एकूण २,६९,००,०००/-रु. किं. च्या एकूण १६ अलीशान कार आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत.


तसेच इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच-१२-केएन-१९४० ही कार एमआयडीसी पो.स्टे. गुरन. । १०७/२०२१, भादवि कलम ३६४(अ), ३८७, ३४२ या गुन्ह्यात एमआपडीसी पोलीसांना जप्त केलेली आहे. अधिक तपास सपोनि सोमनाथ दिवटे, स्थानिक गुन्हे शाखा, हे करीत आहेत.


ही कारवाई . मनोज पाटिल, पोलीस अधीक्षक, , अधीक्षक तसेच अतिरिक्त पोलुस अधीक्षक सौरभ कूमार अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असल्याचेही पोलीस निरीक्षक कटके यांनी सांगितले.


दरम्यान या आरोपीच्या ताब्यातून अन्य ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्या हस्तगत झाल्या आहेत. त्याने अनेक जणांकडून कार  घेऊन तुम्हाला यातून दर महिन्याला जास्तीचे पैसे मिळवून देतो असे त्यांने सांगितले तसेच काही करारनामे सुद्धा त्यांनी करून घेतले होते ,अनेक महिने उलटून गेले तरीही मूळ मालकांना तो पैसे देत नव्हता व गाड्याही परत करीत नव्हता व त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे उजेडात आले व त्यानंतर हा प्रकार पोलिसांनी उजेडात आणल्यावर याचे मोठे रॅकेट असल्याचे लक्षात आले. दर महिन्याला 30-40 हजाराचे भाडे देण्याचे आमिष दाखवून त्याने या घेतलेल्या गाड्या तो 

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only