Thursday, March 4, 2021

तोतया पोलीसाने तिच्याशी शारीरीक संबध जोडून लग्न करतो असे सांगीतले

 


राहाता (तालुका प्रतिनिधी) सोशल मिडीयाच्या माध्यमातून शिर्डी येथील महिलेची  वर ओळख करून शिर्डी येथे पोलीस असल्याचे भासवून  खोटी माहीती देत तिला पोलीस भरतीत मदत करतो असे सांगून बिडच्या तोतया पोलीसाने तिच्याशी शारीरीक संबध जोडून लग्न करतो असे सांगीतले  व मारहान करत तिची फसवणूक केल्या प्रकरणी तोतया पोलीसाविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

   

ही घटणा १७\९\२०२० ते ३\३\२०२१ या दरम्यान घडली     बिड  येथील हिवराफाडी गावातील किरण महादेव शिंदे याने शिर्डी येथील महीलेशी मिशो अँपच्या माध्यमातून मैत्री केली तसेच पोलीस असल्याचे बनावट आयकार्डव फोटो तिला टाकत शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचे भासवून तिच्याशी घसरट वाढविली. तुला पोलीस भरतीत मदत करतो तु नवऱ्याला सोडून दे माझ्याशी लग्न कर तुला सुखी ठेवीन असे सांगून तिच्याशी शारीरीक संबध ठेवले. नंतर तो तोतया पोलीस असल्याचा फिर्यादीला संशय आल्याने तिने त्यास विचारणा केली असता महिलेस लाथा बु्क्यानी मारहानण केली तो राहाता येथे बस स्थानकावर येणार असल्याची माहीती सदर महिलेला समजल्यानंतर तिने त्यानंतर राहाता पोलीसात महिलेने फिर्याद दिली . तिची फिर्याद नोंदवून घेत वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट पोलीसाचे आयकार्ड, पोलीस ड्रेस व फोटो सापडले. या प्रकरणी तोतया पोलीस किरन शिंदे याच्या विरोधात भा द वी कलम ३७६, ४१९, ४२०, १७०, १७१, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.गुन्ह्याचा तपास सहा. पो नि प्रशांत कंडोरे हे करत आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only