Wednesday, March 24, 2021

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन फरार झालेला आरोपी सोलापुर जिल्ह्यामधुन शिताफीने अटक

 अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन फरार झालेला आरोपी सोलापुर जिल्ह्यामधुन शिताफीने अटक


। नगर । दि.24 मार्च । नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन फरार झालेला आरोपी सोलापुर जिल्ह्यामधुन शिताफीने पोलिसांनी अटक केला आहे.


माहिती अशी की, नगर तालुका येथे दि.20 मार्च रोजी दाखल झालेल्या गुन्हयाचा तपास करताना पोलिसांनी शिताफीने गुन्ह्यातील आरोपीने 6 वर्षीय अल्पवरयीन मुलीवर बलात्कार करुन फरार झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शना खाली सुरु होता.


सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन पो.उप.नि. डी.आर.जारवाल ,पो.ना.अशोक मरकड,पोकों,सोमनाथ घावटे असे तपास पथक तयार करुन आरोपीचा 4 दिवसापासुन कर्जत तालुका तसेच करमाळा तालुका जिल्हा सोलापुर येथे वेगवेगळ्या गावांमधे आरोपीचा शोध सुरु होता.


आज दि.24 रोजी आरोपी हा दिवेगव्हाण ता. करमाळा जि.सोलापुर येथे असल्याची खाजीशीर माहीती मिळाल्याने तपास पथक सदर परिसरात पोहचुन आरोपी पकडण्यास पथकास यश मिळाले आहे सदर आरोपीचे नाव भाऊसाहेब बाळू माळी रा.चिचोंडी पाटील ता.जि. अहमदनगर असे आहे.


सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन पो.उप.नि. डी.आर.जारवाल पोहकों बापुसाहेब फोलाणे पो.ना.अशोक मरकड, पोना.सचिन वनवे, पोना.बाळू कदम,पोकों सोमनाथ घावटे व पोना रवि सोनटक्के दिपक शिंदे यांचे पथकाने सदरची कारवाई केली असुन पुढील तपास चालु आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only