Tuesday, March 16, 2021

पोलीस अधीक्षकांच्या गाडीला उसाच्या ट्रकने जोरदार धडक

 


नगर दि 17 प्रतिनिधी

अहमदनगर नगर हामार्गावर असलेल्या जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या दारासमोरच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या गाडीला उसाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. दरम्यान पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना घरी सोडून ही गाडी अधीक्षक कार्यालयात येत असताना हा अपघात झाला.


अहमदनगर नगर महामार्गावर आज सायंकाळी सातच्या सुमाराला जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या समोरच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या गाडीला औरंगाबाद कडून येणाऱ्या उसाच्या ट्रक ने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या गाडीला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये अधीक्षक यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. उसाचा ट्रक कुकडी सहकारी साखर कारखाना कडे  ऊस घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे.


पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना घरी सोडून गाडी चालक पुन्हा मुख्यालयामध्ये येत असताना हा प्रकार घडला जर या गाडीमध्ये अधीक्षक असले असते तर मोठा अनर्थ झाला असता मात्र या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही, या अपघाताची माहिती कळल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित उसाचा ट्रक ताब्यात घेण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या ट्रक ला कोणताही नंबर नाही ही सुद्धा बाब उजेडात आली आहे पुढील कारवाई पोलीस आता करत आहे


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only