Friday, March 12, 2021

अर्बन घोटाळाप्रकरणी बँकेच्या चार जणांना केली अटक

 


नगर दिनांक 12 प्रतिनिधी


नगर अर्बन को-ऑप बँकेच्या तीन कोटी रुपयांच्या चिल्लर घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज चार जणांना अटक केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, दरम्यान या संदर्भामध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी या घटनेचा तपास आम्ही सुरू केल्यानंतर आम्हाला अन्य काही माहिती सुद्धा हस्तगत झाली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.


याप्रकरणी अर्बन बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक घनश्याम बल्लाळ यांच्यासह राजेंद्र हुंडेकरी, प्रदीप पाटील, स्वप्नील बोरा  यांचा आरोपींमध्ये समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे.


नगर अर्बन को-ऑप बँकेच्या शाखेतून तीन कोटी रुपयांचा चिल्लर घोटाळा उघडकीला आलेला होता, सदरची बाब ही बँकेच्या ऑडिटमध्ये लक्षात आल्यानंतर यासंदर्भात काहींनी लेखी तक्रारी सुद्धा बँकेच्या व्यवस्थापनाकडे केलेल्या होत्या, त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापनाने या प्रकारच्या संदर्भामध्ये चंगेडिया -फिरोदिया समितीच्या अधिपत्याखाली चौकशी समिती सुद्धा नेमली होती, या चौकशी समितीचा अहवाल बँक प्रशासनाला प्राप्त झालेला होता, यामध्ये घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले होते ,त्यानुसार संबंधित चौकशी समितीने गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भातील निर्देश बँक प्रशासनाला दिले होते ,त्यानंतर 22 डिसेंबर 2020 रोजी येथील कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये तीन कोटी रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता ,यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहे,


आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला या संदर्भातील कागदपत्रे न दिल्यामुळे चार दिवसापूर्वी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्या पथकाने बँकेवर धाड टाकून दोन दिवस कागदपत्रांची पडताळणी केली, साधारणत पंधरा फाईल हस्तगत केल्या व याप्रकरणी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती, या चौकशीमध्ये म्हणावे असे उत्तरे देण्यात आलेली नव्हती ,त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास केल्यानंतर मार्केट यार्ड शाखेतून  पैसे न भरता धनादेश वटले गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला, यामध्ये आज चार जणांना अटक करण्यात आलेले आहेदरम्यान या संदर्भामध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपाधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी आम्ही या प्रकाराचा तपास सुरू केल्यानंतर अनेक माहिती उजेडात आलेली आहे ,काही खाती सुद्धा आणि तपासले आहेत, यामध्ये अपहार झाल्याचे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही ही कारवाई सुरू केली आहे, यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांची सुद्धा नावे आम्ही निष्पन्न करत असून लवकरच त्यांना अटक करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले,


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only