Wednesday, March 17, 2021

आगामी काळात आर्थिक गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारावे लागेल--- दिघावकर

 नगर दिनांक 18 प्रतिनिधी


पोलिसाचा गणवेश मिळाला ही अभिमानाची बाब आहे .आता आपल्याला देशाची सेवा हेच प्राधान्य ठरवून, गोर गरीब ,शोषित यांची या माध्यमातून सेवा करण्याची संधी आपल्याला मिळणार असून गोरगरिबांची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे तुमची प्रत्येक विषयात दोन हात करण्याची तयारी असली पाहिजे, आगामी काळामध्ये बॉर्डरलेस क्राईम तसेच आर्थिक गुन्ह्यांचे वाढत चाललेले प्रकाराला आळा घालावा लागेल जर त्यात आपण कमी पडलो तर देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा तडा बसल्याशिवाय रहाणार नाही,त्यामुळे पोलिसांनी या सर्व बाबींचा विचार करून आगामी काळामध्ये आर्थिक गुन्ह्यांचे सुद्धा आव्हान स्वीकारावे लागणार आहेत असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रदीप दिघावकर यांनी केले आहे.


अनुकंपा खाली तसेच कोरोना  काळामध्ये ज्या पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या वारसांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम आज पार पडला त्यावेळी ते बोलत होते, यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उप अधीक्षक  प्रांजल सोनवणे, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्याम  धुमे,आदी यावेळी उपस्थित होते.


दिघावकर म्हणाले की, आपल्याला पोलिसांचा युनिफॉर्म मिळाल तो देशाची सेवा करण्यासाठी मिळाला आहे. स्वताचा विचार न करता आपल्या मातृभूमीचा विचार केला पाहिजे, तुमच्या सहकार्‍यांचा विचार केला पाहिजे असे ते म्हणाले. आज तुम्हाला आम्ही नियुक्तीपत्र दिले म्हणजे मोठी कामगिरी केली असेल नाही, आज तुमच्या समवेत अडीच लाख पोलिसांचे कुटुंब आहेत तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठीशी आम्ही सदैव असून असेही ते म्हणाले .तुम्हाला नियुक्तीपत्र द्यायचे हे आमचे उत्तरदायित्व आहे असे ते म्हणाले.


आज देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर जवान उभा राहतो व लढतो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, त्याच पद्धतीने आपल्याला जनसेवा करण्यासाठी या पदाचा उपयोग करायचा आहे. ज्या ठिकाणी अन्याय होत असेल तर तिथे आपले उत्तरदायित्व सिद्ध करा, हीच तुम्हाला संधी आहे ,तुम्ही घातलेला गणवेश हा सहा पिढ्यांची नाही तर दहा पिढ्यची काळजी घेतो असे ते म्हणाले.


कर्तव्य करताना लोकशाहीचे, कायद्याचे तसेच आपल्या आत्म्याचे आपण ऐका काम करा, तुमच्या गणवेशाचा आदर करा, कर्तव्याचा सन्मान करा, तुम्ही जर हे केले तर आपल्या महाराष्ट्रातील पोलीस हे जगातील एक नंबरचे पोलीस होतील याबद्दल कोणाचे मनात शंका नाही, पोलिसांचा गणवेश हा सतीचे वाण आहे, तुमच्याकडून जे चांगले काम होईल तीच खऱ्या अर्थाने तुमच्या कुटुंबाला श्रद्धांजली असेल असेही दिघावकर यांनी म्हटले आहे.


नोकरी करताना आपण काही समाजाचे सुद्धा देणे लागतो ,याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. जो शोषित आहे त्याबद्दल तुम्ही आवाज उठवा, शेतकऱ्यांना महत्त्व द्या, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावा हे तुमचे कर्तव्य आहे असेही ते म्हणाले. आज आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. आर्थिक गुन्हेगारांच्या टोळ्या आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेल्या आहेत पूर्वी दरोडा घालून काही रक्कम लुटायचे पण आता  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या टोळ्या कोट्यावधी रुपये हॅक करून पैसे लुटत आहे, म्हणून आता आपल्याला काही आयाम बदलावे लागतील, बॉर्डर लेस पोलिसांसाठी तयार व्हा सायबर क्राईम  रोखण्यासाठी जर आपण कमी पडलो तर देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा तडा लागेल त्यासाठी आता आपल्याला या सायबर क्राईम रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करावे लागेल त्याची तयारी तुम्ही करा असे दिघावकर यांनी म्हटले आहे.


पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, पोलीस खात्यामध्ये आम्ही पंचवीस विद्यार्थ्यांना आता घेत आहोत. यांचे कुटुंब दुखाच्या प्रसंगातून गेले आहे याची सगळ्यांनाच जाण आहे. त्यांचे दुःख आम्ही कमी करू शकत नाही, मात्र त्यांना त्यांच्या हक्काचे नोकरी मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले ,सरकारच्या आदेशानंतर तात्काळ अनुकंपा च्या जागा भरण्याचा प्रस्ताव सादर केला. दिघावकर यांनी पुढे त्याचा पाठपुरावा केला. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न यांच्या कुटुंबातील  सेवा दिली , मृत्युमुखी पडलेल्यांना त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी त्यांच्या पाल्यांना आम्ही पोलिस  दलात सामील करून घेतले आहे त्यांच्या हातून देशाची सेवा घडो असेही ते म्हणाले.


अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी वरिष्ठ पातळीवरून या अनुकंपा बाबतीत जो निर्णय घेतला ही अतिशय अभिमानाची बाब आहे. ही भरती प्रक्रिया करण्यासाठी दिघावकर साहेबांनी पाठपुरावा केला त्यामुळे या नवीन नियुक्त्या तात्काळ देण्यात आल्या ,आता यामुळे या कुटुंबांना आधार मिळाला आहे . या नियुक्त्या दिल्या त्यांना आता उज्ज्वल भविष्य मिळाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाह

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only