Friday, April 30, 2021

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण १४ व्या वित्त आयोग निधीतून ४५ रुग्णवाहिकांचे हस्तांतरण



 *महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण*


*१४ व्या वित्त आयोग निधीतून ४५ रुग्णवाहिकांचे हस्तांतरण*


अहमदनगर:  महाराष्ट्र दिनाच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाचे यासंदर्भातील नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अहमदनगर महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे आदींची उपस्थिती होती.


सकाळी ८ वाजता ध्वजारोहणाचा हा मुख्य शासकीय सोहळा मोजक्या उपस्थितीत पार पडला.  त्यानंतर,  शासकीय विश्रामगृह येथे  ग्रामविकास विभागाकडून 14 व्या वित्त आयोग निधीतून 45 रुग्णवाहिका जिल्हा परिषदेस कोविड-19 उपाययोजनेसाठी प्राप्त झाल्या. त्याचे  हस्तांतरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज येथील शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले. जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,  अहमदनगर महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल आदींची उपस्थिती होती.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ब्रेक दी चेन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मोजक्या  उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. ****

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only