Tuesday, April 6, 2021

नगरमध्ये बाजारपेठ बंद, कापडबाजारात सामसूम नगर - जीवनावश्यक वस्तू वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आल्याने नगरमध्ये आज मोठा परिणाम पहायला मिळाला.‌कापडबाजारातील दुकाने बंद असल्याने मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या आठवणी जाग्या झाल्या. बाजार पेठा बंद असल्याने अर्थकारणावर मोठा परिणाम जाणवणार आहे. आज बहुतांश ठिकाणी बंद असताना रस्त्यावर लोकांची गर्दी मात्र कायम होती. नगरमध्ये काही व्यापाऱ्यांनी आम्हाला व्यापार करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सुद्धा जिल्हा प्रशासनाकडे केली आहे तर काही संघटनांनी निदर्शने सुद्धा केली आहेत 


जिल्हा 12 मध्ये कुणाच्या पासून वर नियम व अटी पाळून शासनाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने येथील आला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता नगर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी या निर्णय संदर्भामध्ये आमच्यावर तो अन्यायकारक असून आम्हाला दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे जे छोटे व्यापारी आहेत त्यांनी एकत्रितपणे येऊन आज आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्हाला व्यापार करण्याची संधी मिळावी अशी मागणी केलेली आहे नगर शहरातील छोट्या व्यावसायिकांनी एकत्रितपणे येऊन आज कापड बाजार येथे निदर्शने केली व त्यांनी दुकाने सुरू करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे.


आज बंदमुळे नगर शहरातील व्यापारी पेठा बंद राहिलेल्या होत्या आणि बाहेरगावाहून आलेल्यांना पुन्हा माघारी जाण्याची वेळ आली, शहरांमध्ये तालुक्यातून येणाऱ्यांची गर्दीतला मोठ्या प्रमाणात असते मात्र आज व्यवहार बंद असल्यामुळे त्यांना पुन्हा परत जावे लागले, शहरांमधली कापड बाजार, नवी पेठ यासह महत्त्वाची असलेली बाजारपेठ या संपूर्णपणे बंद होत्या. त्यातच हॉटेल सुविधांचा प्रश्न हा चांगलाच ऐरणीवर आला होता एकीकडे हॉटेल चालकांना पार्सल सुविधा देण्याचा निर्णय झाला मात्र दुसरीकडे परमिट रूम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच वाईन शॉप हे सुरू ठेवण्याचा निर्णय सुरुवातीला घेण्यात आला होता स्थानिक प्रशासनाने मात्र त्यास नकार दिल्यामुळे आज सकाळपासूनच वाईन शॉप हे बंद ठेवण्यात आले आहे.


 होटेल असोसिएशन  व  लिकर्स असोशीने जिल्हा प्रशासनाकडे मागणी करून आमचे व्यवहार सुरू करून द्या अशी मागणी केलेली आहे. या संदर्भामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कडून जोपर्यंत शासनाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत परमिट रूम व वाईन शॉपी बंदच राहतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


आजच्या या बंदमुले त्याचा व्यापारी, उद्योजक व्यवसायावर मोठा परिणाम दिसू लागलेला आहे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार आज थांबले गेलेले आहेत त्यातच छोटे व्यवसायिक सुद्धा बंद असल्यामुळे त्याचा परिणाम आता जाणवू लागलेला आहे.. 

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only