Monday, April 26, 2021

आनंदाची बातमी आज ३१९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २८६६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

 


*दिनांक २६ एप्रिल, २०२१*


*आज ३१९५ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या २८६६ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.८० टक्के*


अहमदनगर: जिल्ह्यात आज  ३१९५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ६८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.८० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८६६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ८४० इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६०८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६४२ आणि अँटीजेन चाचणीत ६१६ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८८, अकोले २४१, जामखेड ९१, कर्जत १०५, कोपरगाव ३०, नगर ग्रामीण ७३, नेवासा ४०, पारनेर ९२, पाथर्डी ९७, राहता ३८, राहुरी २८, संगमनेर २२४, शेवगाव २१८, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ५१, कॅंटोन्मेंट बोर्ड ४९, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३२, अकोले २२, कर्जत ०६, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ३३, नेवासा १०,  पारनेर ०५, पाथर्डी ०३, राहाता ८१,  राहुरी ०८, संगमनेर १६२, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर २५, कॅंटोन्मेंट बोर्ड २३ आणि इतर जिल्हा १५ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ६१६ जण बाधित आढळुन आले. मनपा ४९, अकोले १४, जामखेड ०९, कर्जत ७२,  कोपरगाव ३४, नगर ग्रामीण ५१, नेवासा ७४, पारनेर २९,  पाथर्डी २६,  राहाता ४०, राहुरी ८४, संगमनेर ०६, शेवगाव १६ श्रीगोंदा ८१, श्रीरामपूर २५ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ७२६, अकोले १९९, जामखेड ४५, कर्जत २१२,  कोपरगाव १८२, नगर ग्रामीण २५५, नेवासा ११०, पारनेर १३४, पाथर्डी ८९, राहाता २०४, राहुरी १०३, संगमनेर २९५,  शेवगाव २११,  श्रीगोंदा १२०,  श्रीरामपूर ११२, कॅन्टोन्मेंट १२६, मिलिटरी हॉस्पिटल २३ आणि इतर जिल्हा ४९ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:१,३७,६८६*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:२२८४०*


*मृत्यू:१८४९*


*एकूण रूग्ण संख्या:१,६२,३७५*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only