Tuesday, April 6, 2021

अधिकचे डिपॉझिट घेतल्यास कारवाई करणार जिल्हाधिकारी भोसले

 


नगर दि 6 प्रतिनिधी


 खाजगी रुग्णालय पेशंट कडून अवाजवी डिपॉझिट घेत आहे या संदर्भामध्ये संबंधित डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाची यांची बैठक घेऊन त्यांना याबाबतची सूचना देण्यात येईल, कुणीही  अवाजवी डिपॉझिट घेऊ नये हे सांगितले जाईल जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल असे नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी  संदीप निश्चित उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले म्हणाले की, कोरोना च्या काळामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये आयुक्त तर जिल्हा परिषदांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार दिलेले आहेत, मागील वर्षभरामध्ये नगर शहरातील अनेक रुग्णालयांनी अवाजवी बिल घेतलेली होती त्या संदर्भातली तपासणी मध्ये आढळून आल्यानंतर  रुग्णालयांच्या विषय हा पुढे आला होता या संदर्भामध्ये आम्ही नोटिसा बजावून पुढील कारवाई सुरू केलेले आहे सतरा रुग्णालयाचा त्यामध्ये समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय हा बंद ठेवण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये विचारले असता शासनाने जे नियम व अटी दिलेल्या आहेत त्या संदर्भातला हा विषय आहे, सध्या कोरोना चा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे जे निर्बंध आहेत    त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे सध्यातरी हॉटेल व्यवसाय बंद राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 


 निर्बंध संदर्भामध्ये राज्य शासनाने जे नियम व अटी दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही सर्व प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत आज संध्याकाळी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाची संयुक्तिक बैठक होणार आहे यामध्ये सुद्धा राज्य सरकारने दिलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन कशा पद्धतीने करता येईल या बाबतीत चर्चा सुद्धा या बैठकीमध्ये केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी सांगितले.


 नगर जिल्ह्यामध्ये आज पासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा या बंद करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे काही संघटनांनी व्यापार सुरू करण्याची मागणी केली असली तरी तो विषय शासन स्तरावर चा आहे सध्या नियम व निर्बंध जे दिलेले आहेत त्याचे आम्ही काटेकोरपणे अंमलबजावणी करत असल्याचेही जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only