Monday, April 5, 2021

आज ११०० रूग्णांना डिस्चार्ज तर

 


*दिनांक ०५ एप्रिल, २०२१*


*आज ११०० रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या १८४२ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.०४ टक्के*


अहमदनगर: जिल्ह्यात आज ११०० रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९२ हजार १४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८४२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०१०६ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६७२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५८० आणि अँटीजेन चाचणीत ५९० रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३२१, अकोले ६५, जामखेड २१, कर्जत १३, कोपरगाव ५८, नगर ग्रामीण ३८, नेवासा ०५, पारनेर १८, पाथर्डी ०५, राहता १०, राहुरी ०३, संगमनेर ६६, शेवगाव ०१,  श्रीरामपूर २६,  कॅंटोन्मेंट बोर्ड १८ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७८, अकोले ०४, जामखेड ०२, कर्जत ०५, कोपरगाव ५०, नगर ग्रामीण ३०, नेवासा १०,  पारनेर ०९, पाथर्डी ११, राहाता १०५,  राहुरी ३२, संगमनेर ४६, शेवगाव ०७, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ६१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ५९० जण बाधित आढळुन आले. मनपा १६७, कर्जत १५, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ६१, नेवासा ३९, पारनेर ३४, पाथर्डी ४३,  राहाता २६, राहुरी २९, संगमनेर ०१, शेवगाव ८६, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ६३, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०५ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ३९९, अकोले ४५, जामखेड ७१, कर्जत ७२,  कोपरगाव २३, नगर ग्रामीण ६३, नेवासा २४, पारनेर २१, पाथर्डी २७, राहाता ९३, राहुरी ६५, संगमनेर ७२,  शेवगाव १५,  श्रीगोंदा १६,  श्रीरामपूर ७८, कॅन्टोन्मेंट ११ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:९२१४८*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:१०१०६*


*मृत्यू:१२४२*


*एकूण रूग्ण संख्या:१,०३,४९६*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only