Tuesday, April 27, 2021

इंजेक्शन हे रुग्णालयांना पुरवण्यासाठी प्रांताधिकार्‍यांना नियुक्त केले

 


नगर दिनांक 27 प्रतिनिधी


नगर जिल्ह्यामध्ये रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणामध्ये होत असतानाच , त्यामध्ये आता नियोजन शा पद्धतीने करायचे याचे प्रशासन नियोजन करत आहे, आता जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी संबंधित इंजेक्शन हे रुग्णालयांना पुरवण्यासाठी प्रांताधिकार्‍यांना नियुक्त केले असून त्याबाबतचे आदेश दिले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये दररोज येणारा साठा हा अत्यंत तुटपुंजा असल्यामुळे पुन्हा इंजेक्शन साठी धावपळ सुरू झाली आहे.


नगर जिल्ह्यामध्ये इंजेक्शनच्या साठा हा अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे ते कोणाकोणाला कसे पुरवायचे असा प्रश्न आता निर्माण झालेला असतानाच दुसरीकडे ऑक्सिजनचा पुरवठा म्हणावा असा नाही, चार दिवस पुरेल एवढाच त्यांचा साठा नगर जिल्ह्यामध्ये सध्या आहे. दोन दिवसापूर्वी नाशिक येथून दोन टॅंकर नगर येथे प्राप्त झाले होते. त्यामुळे नगर जिल्ह्याला आता चार दिवस पुरेल एवढा साठा आहे.


इंजेक्शन रुग्णालय  मिळाले पाहिजे  संबंधित नातेवाईकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी चांगलीच पळापळ सुरू झाली आहे .नगर जिल्ह्याला दि 14 पासून अवघा आठ हजार 343 साठा उपलब्ध झाला आहे नगर शहरामध्ये रुग्ण संख्याही वाढत चालले आहे विशेष म्हणजे तालुका स्तरावर  असणारे रुग्ण नगर शहरामध्ये येऊ लागले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये आता जागाच शिल्लक राहिली नाही, तर खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा  तशा प्रकारची अवस्था पुन्हा पाहायला मिळत आहे.

 

नगर जिल्ह्यासाठी जे इंजेक्शन येते  आहे त्याचे नियोजन करण्यासाठी आता प्रशासनाने निर्णय घेतला असून प्रांत अधिकारी यांना आता त्याबाबतचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहे. जे इंजेक्शन तालुक्याला पुरविले जातील ते संबंधित रुग्णालयांमध्ये त्याच्या नातेवाईकांना देण्याची जबाबदारी आता निश्चित करण्यात आली आहे, जिल्हाधिकारी भोसले यांनी त्याबाबतचे आदेश दिले असून त्याची अंमलबजावणी कालपासून सुरू झालेली आहे.


चौकट


प्रशासनाकडे इंजेक्शन चा साठा प्राप्त होईल त्यानुसार तो संबंधित तालुक्यांना देण्यात येतो त्यासाठी आता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये काल 537 इंजेक्शन प्राप्त झाले त्याचे वितरण त्याच्या तालुक्यात करण्यात आले आहे शहरी भागांमध्ये सुद्धा रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे तेथे सुद्धा आता इंजेक्शन सर्वत्र पुरवण्यात येत असल्याचे उपजिल्हाधिकारी उद्या कसवे यांनी सांगितले

आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांकडे इंजेक्शन देत असून थेट रुग्णालयात देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only