Wednesday, April 21, 2021

संचारबंदी चे उल्लंघन करणाऱ्या 90000 नागरिकांकडून दीड कोटी रुपयांचा दंड वसूल

 


नगर दिनांक 22 प्रतिनिधी 
राज्यभरात संचारबंदी लागू केल्यानंतर अनेक जण रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. त्याला आळा बसावा यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली असून, पाच दिवसांमध्ये 23 लाख 73 हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. जिल्ह्यात एकूण पाच हजार 732 म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे.


कोरोनाचा वाढत प्रकोप रोखण्यासाठी राज्य सरकारने 144 कलम लागू केलेला आहे. या कलमाचे उल्लंघन केले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसापासून जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. जे विनाकारण फिरत आहे अशांना मज्जाव करण्यात येऊन त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.


नगर शहरामध्येही नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह नगर- मनमाड महामार्ग, नगर- पुणे महामार्ग व नगर- अहमदनगर महामार्गावर जात बॅरिकेट्स लावून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच दुचाकी चालकांनाही सुद्धा विनाकारण फिरत असताना पकडल्यानंतर त्यांच्याकडून किमान दोनशे ते पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांत वाहनांची तपासणी केल्यानंतर अनेक जण विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच काही जणांकडे लायसन नाही तर काहीजणांच्या गाडीवर नंबर प्लेट नाहीत, असे चित्र पाहायला मिळाले. आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये 23 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.


नगर जिल्ह्यामध्ये  23  लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे गेल्या पाच दिवसापासून ची ही कारवाई असून गेल्या सहा महिन्यांमध्ये संचारबंदी चे उल्लंघन करणाऱ्या 90000 नागरिकांकडून दीड कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे असेही पाटील यांनी सांगितले भादवि कलम 188 प्रमाणे 26 हजार 853 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 20148 आरोपी आहेत.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only