Wednesday, April 21, 2021

एका नागरिकाने या कार्यालयावर दगड मांडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला अटकाव करून तात्काळ ताब्यात घेतले. नगर दिनांक 22 प्रतिनिधी 


नगर-मनमाड महामार्गावरील असलेले अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालय बंद असल्यामुळे व तेथील अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्यामुळे संतप्त झालेल्या एका नागरिकाने या कार्यालयावर दगड मारण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला अटकाव करून तात्काळ ताब्यात घेतले.


सध्या नगरमध्ये इंजेक्शनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे रुग्णांच्या नातेवाईकांना चांगलीच पळापळ करावी लागत आहे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या अंतरी मध्ये ही व्यवस्था देण्यात आली असून तहसीलदार या कमिटीचे प्रमुख म्हणून आहेत इंजेक्शन मिळत नाही म्हणून थेट अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयामध्ये संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ काराळे  हे नगर मनमाड रोडवरील अन्न व औषध कार्यालयात आले असता त्या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता याविषयी त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलिसांना जाब विचारला आज सुट्टी असल्याने याठिकाणी कोणीही आले नाही परंतु जिल्हाधिकारी कार्यालय येथे या कार्यालयाशी निगडित व्यक्ती उपस्थित आहे असे पोलिसांनी त्यांना सांगितले परंतु जे फोन नंबर प्रशासनाने जाहीर केले आहे त्यातील एकही अधिकारी फोन उचलत नसल्याचे त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून देत कार्यालयावर दगड फेकले यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only