Wednesday, April 28, 2021

सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्‍कर यांच्‍या निधीतून रू. 10 लाख कोवीडच्‍या उपचारासाठी घ्‍यावी सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्‍कर यांच्‍या निधीतून रू. 10 लाख कोवीडच्‍या  उपचारासाठी घ्‍यावी

नगर -   गेल्‍या 1 वर्षापासून कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्‍यामुळे नागरिकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न मोठया प्रमाणात निर्माण झाला आहे. यासाठी आरोग्‍य यंत्रणा सक्षम करण्‍यासाठी प्राधान्‍यक्रम देणे गरजेचे आहे. विकास कामापेक्षा सध्‍या नागरिकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न महत्‍वाचा असल्‍यामुळे सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्‍कर यांनी आपल्‍या शहर विकास  निधीतून रू. 10 लाख  कोवीड रूग्‍णांच्‍या उपचारासाठी घ्‍यावा असे पत्र मा.आयुक्‍त श्री.शंकर गोरे यांना दिले.

      सभागृह नेते यांनी पत्रात म्‍हटले आहे की, शहरामध्‍ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असून रूग्‍णांची संख्‍या वाढत आहे. मनपा आरोग्‍य विभागाच्‍या वतीने कोरोना रूग्‍णांना योग्‍य ते उपचार मिळण्‍याच्‍या दृष्टिने सर्वतोपरी प्रयत्‍न सुरू असून कोवीडच्‍या रूग्‍णांना आवश्‍यक असणारी साधन सामुग्री, औषधोपचार अशा बाबीसाठी निधीची आवश्‍यकता भासते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्टिने फक्‍त कोवीड रूग्‍णांसाठी व कामासाठी या निधीचा वापर करावा अशी सुचना यावेळी केली. यावेळी सावेडी भाजपा मंडल अध्‍यक्ष मा.श्री.सतिष शिंदे, मा.श्री.अमित गटणे, मा.श्री.बाबासाहेब भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्‍कर यांच्‍या निधीतून रू. 10 लाख कोवीडच्‍या  उपचारासाठी घ्‍यावी

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only