Saturday, April 10, 2021

खासगी रुग्णालयांमध्ये आता 80 टक्के जागा राखीव ठेवणार
 नगर दि10 प्रतिनिधी नगर जिल्ह्यामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढत चालला आहे आता खासगी हॉस्पिटलमध्ये 80 टक्के जागा या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आम्ही संबंधित यंत्रणेला दिले असल्याची माहिती नगर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील आदी यावेळी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. रुग्णांची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे. जनतेने नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे याबद्दल दुमत नाही, सध्या खाजगी रुग्णालयामध्ये आम्ही कोरोनाचे रुग्ण ऍडमिट करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. सध्या प्रशासन या सर्व बाबींचा आढावा घेऊन आम्ही आता 80 टक्के जागा या खाजगी रुग्णालयामध्ये राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणा दिल्या असून महानगरपालिका क्षेत्रामध्ये आयुक्तांना तर जिल्हा जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्या असून त्याची आजच अंमलबजावणी करण्याचे सांगितले आहे.


नगर जिल्ह्यामध्ये रेमेडीसेल इंजेक्शन चा साठा हा सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये आहे. साठा जरी कमी असला तरीही नवीन इंजेक्शनची मागणी ही करण्यात आलेली आहे. लवकरच जिल्ह्यामध्ये हे इंजेक्शन उपलब्ध होईल, असेही जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. हे इंजेक्शन सर्व मेडिकल मध्ये उपलब्ध नाही ,ज्या ठिकाणी कोविड सेंटरचे हॉस्पिटल आहे तेथील मेडिकलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ते त्याच ठिकाणी उपलब्ध होतील असे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीमध्ये इंजेक्शन चा साठा संपला किंवा कोणी काळाबाजार केला जर हे निदर्शनास आले त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only