Monday, April 12, 2021

माहिती सुविधा केंद्र उभारावे आणि शहरातील मनपाच्या कोविड सेंटरची यादी प्रसिद्ध करावी. माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांची मागणी.

 


शहरातील सर्व खासगी रुग्णालयामध्ये प्रशासनाने माहिती सुविधा केंद्र उभारावे आणि शहरातील मनपाच्या कोविड सेंटरची यादी प्रसिद्ध करावी. माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांची मागणी.
नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडविला आहे.त्यातच दिवसेंदिवस पॉजिटीव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या प्रमाणात पुरेसे हॉस्पिटल, बेड, उपलब्ध होऊ शकत नाही.अशा परिस्थितीमध्ये रुग्णांचे, नातेवाईकांचे हॉस्पिटल शोधताना एक-एक दिवस जात आहे. वेळ प्रसंगी हॉस्पिटल न मिळाल्याने रुग्ण दगावू शकतो. यावर आता प्रशासनाने खाजगी रुग्णालय ताब्यात घेतले आहेत. परंतु या रुग्णालयात रुग्ण गेल्यावर त्यास जागा शिल्लक नाही असे सांगितले जाते. यावर प्रशासनाने सर्व खाजगी रुग्णालयात माहिती सुविधा केंद्र सुरु केल्याने रुग्णाला मदत मिळू शकेल.तसेच मनपाच्या वतीने शहरात किती कोविड सेंटर चालू केले व कोणत्या ठिकाणी किती बेड व्यवस्था याची माहिती जाहीर करणे गरजेचे आहे. त्यामुळे सामान्य रुग्णाला मोठा दिलासा मिळू शकतो असे  निवेदन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी मनपा आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात म्हणाले आहे..

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only