Tuesday, April 20, 2021

स्वयंसेवी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

 


नगर दिनांक 20 प्रतिनिधी 


तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा करा, रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून द्या, जनतेला बेडसुध्दा उपलब्ध करून द्या यासह विविध मागण्यासाठी नगर शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले, स्नेहालय गिरीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.


नगर शहरामध्ये अनेक रुग्णांना आज बेड मिळू शकत नाही तसेच इंजेक्शन चा साठा हा संपल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पळापळ करावी लागते. प्रशासनाने नंबर दिले खरे मात्र ते नंबरच लागत नाही, आणि त्यांना इंजेक्शन उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. तीन दिवसांपूर्वी आम्ही आंदोलन केले मात्र तरीही प्रशासनाला जाग आली नाही, त्यामुळे आता आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयास समोर स्वयंसेवी महासंघाच्या वतीने आज ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.


महासंघाच्या स्वयंसेवकांनी आज निषेधाचे फलक फडकवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. जोरदार घोषणाबाजी यावेळी देण्यात आली व प्रशासनाच्या कारभाराचा धिक्कार सुद्धा यावेळी करण्यात आला.


यावेळी बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाले की, आज नगर जिल्ह्यामध्ये रुग्णांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे वेळेवर कोणतीही सुविधा मिळत नाही प्रशासन गांभीर्याने दखल घ्यायला तयार नाही तीन दिवसांपूर्वी आम्ही निवेदन दिले होते त्यावेळी आम्हाला जे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी कुठेही झालेली नाही असे दिसून आलेले आहे नगर शहरामध्ये अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आता संपत आलेला आहे त्यामुळे त्या रुग्णांना इतरत्र हलवण्याची लगबग सुद्धा सुरू झालेली आहे जर ऑक्सिजन वेळवर मिळाला नाही तर अनेक रुग्ण दगावण्याची शक्यता सुद्धा आहे एवढे असताना देखील प्रशासन या गोष्टी गांभीर्याने का घेत नाही ते रुग्णांची का हेडसळ करतात असा आरोपही कुलकर्णी यांनी यावेळी केला जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


वकील श्याम असावा म्हणाले की ,नगर शहरामध्ये रुग्णांची संख्याही वाढत चाललेले आहे कुठेही इंजेक्शनचा साठा उपलब्ध नाही अजूनही त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येक ठिकाणी इंजेक्शन चा शोध घेण्यासाठी फिरावे लागत आहे जे नंबर प्रशासनाने जाहीर केलेले आहेत तेथे कधीच उत्तरे दिली जात नाही अथवा अनेक अधिकाऱ्यांचे फोन बंद असतात हीसुद्धा गंभीर बाब आहे आज नगर जिल्ह्यामध्ये दोन हजार अधिक गुन्हे ऑक्सिजनवर आहेत नगर शहरामध्ये आज पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा आहे एवढ्या असतानादेखील प्रशासन कोणतीच दखल घेतली नाही तर याला प्रशासनच जबाबदार राहील असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only