Thursday, April 29, 2021

श्रमिक बालाजी मंदिर तर्फे गरजूंना किराणा वाटप

 


श्रमिक बालाजी मंदिर तर्फे गरजूंना किराणा वाटप 


               नगर- येथील सावेडीतील  श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या तर्फे सध्या चालू असलेल्या लोकडाडाऊन मध्ये अत्यंत गरज आहे अशा९०  कुटुंबांना किराणा सामान वाटप करण्यात आले . यामध्ये पाच किलो तांदूळ, एक किलो तुरीची डाळ ,एक किलो तेल व एक टरबूज प्रत्येकी देण्यात आले . 


              लॉकडाऊन  पुन्हा सुरू झाल्याने अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक चणचण भासू लागली व रोजीरोटी बंद असल्याने त्यांची निकड लक्षात घेऊन आज त्यांना शासनाचे सर्व नियम पाळून आज त्यांना ज्येष्ठ नेते अंबादास चिट्याल , नगरसेवक मनोज दुलम यांच्या हस्ते किराणा  वस्तू देण्यात आल्या. 


             यावेळी बालाजी मंदिराचे अध्यक्ष विनोद म्याना , उपाध्यक्ष अशोक इप्पलपेल्ली , सेक्रेटरी राजू येमुल, मार्कंडेय  पतसंस्थेचे चेअरमन नारायण कोडम , कुमार कोलपेक, कांतीलाल पत्तिपाका,राजू गड्डम, ज्ञानेश्वर कोंडा,सागर महेशसुनी,वैभव कंदी , विष्णू  रच्चा आदी उपस्थित होते. यासाठी यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले फोटो - सावेडीतील  श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या तर्फे सध्या चालू असलेल्या लोकडाडाऊन मध्ये अत्यंत गरज आहे अशा९०  कुटुंबांना किराणा सामान वाटप ज्येष्ठ नेते अंबादास चिट्याल,नगरसेवक मनोज दुलम यांच्या हस्ते करण्यात आले,समवेत विनोद म्याना,अशोक इप्पलपेल्ली,राजू येमुल,नारायण कोडम,कुमार कोलपेक आदी

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only