Saturday, April 17, 2021

घोसपुरीत दरोडा टाकणारे तिघे गजाआड

 


घोसपुरीत दरोडा टाकणारे तिघे गजाआड 


स्थानिक गुन्हे शाखेसह नगर तालुका पोलिसांची कारवाई | आरोपींकडून 65 हजारांचा मुद्देमाल जप्त


अहमदनगर | नगर सह्याद्री 

नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात दरोडा टाकणारे तीन आरोपी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेसह नगर तालुका पोलिसांना यश आले आहे‌. राहुल नेवासा भोसले (वय 22, रा. वाळकी, ता. नगर), दगू बडोद भोसले (वय २७, रा. पढेगाव, ता. कोपरगाव) आणि उरूस ज्ञानदेव चव्हाण (वय ३०, रा. वाळकी, ता. नगर) अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी दगू भोसले तीन वर्षापासून मोक्याच्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्याविरोधात गंभीर प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहे.

बुधवार दि. 14 एप्रिल रोजी नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात फिर्यादी हर्षल चौधरी यांना स्वस्तात गोडेतेलाचे डबे देतो असे सांगून आरोपींनी बोलावून घेतले होते. फिर्यादी चौधरी हे तेथे आल्यानंतर त्यांना निर्जनस्थळी नेऊन मारहाण करून त्यांच्याकडील 76 हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी दरोडा टाकून चोरला होता. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात हर्षल चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमण्यात आले होते. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेतला असता या दरम्यान पोलिस निरीक्षक कटके यांना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा आरोपी राहुल भोसले यानी केला आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळकी येथे सापळा लावून आरोपी भोसले याला पाठलाग करून ताब्यात घेतले. आरोपीकडे गुन्हाबाबत चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार दगू

भोसले आणि उरूस चव्हाण यांच्या साथीने केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने आरोपी भोसले आणि चव्हाण यांना ताब्यात घेतले.

आरोपींकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी १० हजार रुपयांचा आयफोन मोबाइल तसेच गुन्ह्यात वापरलेला पाच हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि होंडा कंपनीची 50 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून आरोपी राहुल भोसले यांच्याविरोधात तीन तर आरोपी उरूस चव्हाण यांच्याविरोधात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींना मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करत आहेत.

 सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोहेकाॅ. दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, सुनील चव्हाण, संदीप पवार, रवी सोनटक्के, पोकॉ. आकाश काळे, प्रकाश वाघ, दीपक शिंदे, चालक पोहेकॉ. बबन बेरड यांच्यासह नगर तालुका पोलिसांनी केली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only