Sunday, April 18, 2021

जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी मोठ्या फौजफाट्यासह केली बंद ची पाहणी नगर शहरासह जिल्ह्यात बंदला उस्फूर्त प्रतिसाद नगर दि  18 प्रतिनिधी 


विकेंड लोकडाऊन  आज नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला, मेडिकलचे दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली होती ,नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर शहरामध्ये मोठ्या फोर्स फाट्या सह एक प्रकारे संचालन करून बंदचा आढावा घेतला दरम्यान जिल्हाधिकारी भोसले यांनी नागरिकांनी बंदला प्रतिसाद दिले असल्याचे सांगितले तर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जो कोणी विनाकारण फिरत आहे त्याला आम्ही पोलिस ठाण्यामध्ये आणून  फिरण्याचे कारण योग्य नसल्यास त्याचे  समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.


शनिवार व रविवार असल्यामुळे  जनता करफुचे  त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते त्यानुसार आज जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर शहरातील पाईपलाईन रोड सावेडी भागांमध्ये आज दुपारी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह बंदचा आढावा घेतल

यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते


पाईपलाईनरोड सावेडी तारकपूर एसटी चौक भिंगार भिंगार कॅम्प जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पुणे बस स्थानक माळीवाडा कापड बाजार नवी पेठ किती रोड दिल्ली गेट या मार्गाने या बंदचा आढावा घेण्यात आला होता सुमारे 20 हून अधिक वाहने या अधिकाऱ्यांच्या ताफ्यामध्ये होती.


यावेळी जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, सकाळी सात ते अकरा एवढा कालावधी मध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी  सूचना दिल्या आहेत , नियमांचा वापर केला पाहिज, फक्त मेडिकल च्या संदर्भात मुभा देण्ययाआली आहे. विनाकारण कोणीही बाहेर पडू नये असेे ते म्हणाले, एक तारखेपर्यंत नवीन नियमानुसार सकाळी अकरानंतर लॉक डाऊन  राहणार आहे असेही ते म्हणाले.जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की आज बंदला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे अत्यावश्यक असेल तरच नागरिकांनी बाहेर पडले पाहिजेल विनाकारण बाहेर पडत असेल तर त्यांना अटकाव केला जाईल वेळप्रसंगी त्यांना पोलीस ठाण्यांमध्ये नेऊन त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल विशेष म्हणजे ते का घराबाहेर पडले कशासाठी पडले याचे त्यांना आत्मपरीक्षण मिळावे याकरता आम्ही त्या ठिकाणी समुपदेशन सुद्धा करणार आहोत असेही जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.  अत्यावश्यक असलेल्यांना बाहेर पडू शकता त्यांना कुठलाही त्रास कोणी देणार नाही,   पुन्हा कारण जे पद्धत आहे त्यांच्यावर कारवाई केल्यावर त्यांना आमचे पोलीस अधिकारी किंवा तत्सम व्यक्ती त्यांना समुपदेशन करतीलच पण आपण घराबाहेर पडल्यामुळे कशा पद्धतीने हानी होते याची माहिती आम्ही त्यांना देणार आहोत असेही ते म्हणाले खरच पेशंट  ऍडमिट असेल त्याला औषध घेऊन जायचं घरामध्ये असू शकतो त्याचं ते पोलिसांनी योग्य निर्णय घ्यावा तर विनाकारण फसवण्यासाठी असं जर कोणी प्रकार करत असेल तर त्याला मात्र थोडा वेळ खर्च करावा, लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


चौकट


येथील माळीवाडा बस स्थानकाच्या बाहेर 12 कार्यालय उघडे होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्या ठिकाणी जाऊन तात्काळ ती कार्यालय बंद करा अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले तर माळीवाडा येथील एका मेडिकल स्टोअर वर जिल्हाधिकारी भोसले व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी समक्ष मेडिकल दुकानांमध्ये जाऊन ते नेमके काय काय वस्तू दिसतात याची माहिती घेतल्यावर त्या ठिकाणी स्टेशनरी व अन्य साहित्य सुद्धा विक्री करणार असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना तेथून हटविण्यास सांगितले व फक्त मेडिकल चे औषध विकास असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा संबंधित  मेडिकल चालकाला दिला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only