Friday, April 30, 2021

लॉक डाऊन करावा लागणार असून फक्त मेडिकल व दुधाचे दुकाने चालू ठेवा अशा प्रकारचे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ


 

रुग्ण कमी होत नाही, याची चिंता

लॉक डाऊन आपण जाहीर केला मात्र त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली याचा सारासार विचार केला पाहिजे. या काळात उलट रुग्ण संख्या वाढली व पॉझिटिव्ह केससुद्धा वाढल्या, ही चिंतेची बाब आहे त्यामुळे आता आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे व शासनाला सगळ्यांनीच मदत केली पाहिजे,  असे सांगून ते म्हणाले, आगामी काळात आपल्याला कडकच लॉक डाऊन करावा लागणार असून फक्त मेडिकल व दुधाचे दुकाने चालू ठेवा अशा प्रकारचे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. आता पुढील काळामध्ये आपल्याला जनता कर्फ्यू जाहीर करावे लागणार आहे व तो कडक करावा लागणार आहे, कोविडच्या दुसर्‍या लाटेमध्ये आपण उपाययोजना करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. जर ते केले असतील तर आज एवढा मोठा उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला नसता.आता तिसरी लाट येणार असे बोलले जात आहे आता जर आपण सुविधा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा जर वेळेत करू शकलो नाही तर आपण राज्य चालवण्यामध्ये अपयशी ठरलो असे म्हटल्या शिवाय राहणार नाही म्हणून याचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील सर्व प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.


दुसरा लॉक डाऊन हा कोणीच गांभीर्याने घेतला नाही. वर पासून खाल पर्यंत सर्व गाफील राहिले देशांमध्ये ही परिस्थिती झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम, निवडणुका या सर्व पाहिल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला दिसून आला, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

आता कडक लॉकडाऊन


नगर जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यु करून देखील रुग्ण संख्या कमी झाली नाही त्यामुळे आता कडक जनता कर्फ्यू शिवाय आपल्याला पर्याय नाही. करोनाच्या आगामी तिसऱ्या लाटेमध्ये जर आपण आरोग्याच्या सुविधा व ऑक्सिजन देऊ शकलो नाही तर आपण राज्य चालवण्यास अपयशी आहोत, असे म्हणावे लागेल असे सांगून ते म्हणाले, आता कडक लॉ कडाऊन होणार असून केवळ दूध व मेडिकल सेवाच सुरू ठेवल्या जाणार आहेत. तसेच फुबीफल्यू गोळ्या व टेस्टिंग किट यासंदर्भात नफेखोरी कंपनीने सुरू केले आहे.सहा रुपयाची गोळी 26 रुपायाला तर साडेसहाशे रुपयेचे कीट तेराशे रुपये दिले जाते. त्यामुळे कंपन्यांच्या नफेखोरी संदर्भात आता राज्य सरकारने संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे व याबाबत अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी आपण बोललो असून, त्यांनीही अशा कारवाईला सुरुवात करण्याची ग्वाही दिली आहे, असे ते म्हणाले .

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only