Monday, April 19, 2021

आता घरोघरी जाऊन भाजी विक्री

 


नगर दि 19 प्रतिनिधी


 नगर शहरामध्ये भाजी मार्केट बंद केल्यानंतर आता घरोघरी जाऊन भाजी विक्री करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिले असून त्याबाबतचे आदेश ही लेखी स्वरूपात दिले असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिली 


गोरे म्हणाले की ,14 ठिकाणचे मुख्य भाजी विक्रीची केंद्र होती ते आपण गेल्या पाच तारखेपासून जिल्हा मधे कोरोना प्रादुर्भाव सुरू झाला त्यामुळ विक्री आपण बंद केलेली होती आणि आपण भाजी विक्रेत्यांना काही चौकांमध्ये जाऊन  भाजी फिरून विकण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती, परंतु गेल्या एक-दोन दिवसांमध्ये असे निदर्शनात आले की ज्या ठिकाणी आपण भाजी विक्रेत्यांना चौकामध्ये फिजिकल डिस्टन्स ,सोशल डिस्टन्स ठेवून भाजी विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली होती तथापि गेल्या दोन दिवसांमध्ये या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे निदर्शनास येत आहे आणि भाजी घेण्यासाठी झुंबड झुंबड बाहेर पडत आहे म्हणून आज महापालिका प्रशासनाने असा निर्णय घेतला की भाजीविक्री चा टाइमिंग हा सकाळी सात ते अकरा असा आहे  या वेळेत घरोघरी जाऊन भाजी विक्री करावी असे आदेश दिले असल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only